"प्रेयसीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले" नोटमध्ये लिहिली आरोपींची नावे, आरोपी अजूनही मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:34 IST2025-11-10T19:33:43+5:302025-11-10T19:34:10+5:30
Amravati : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

"Lover pushed me to commit suicide" The names of the accused were written in the note, the accused is still at large
अमरावती : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष वानखडे (४५, वडालगव्हाण, दर्यापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० ते ९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. ९ नोव्हेंबरच्या रात्री १०.१२ वाजता चंदा वानखडे (६२, वडालगव्हाण, दर्यापूर) यांच्या तक्रारीवरून आरोपी ममता ठाकूर (बुलढाणा), बी. जी. महाजन, सचिन हरणे आणि रूपेश पाटील (तिघेही रा. देवपूर, धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वानखडे हा धुळ्याच्या भूजल सर्वेक्षण विभागात कार्यरत होता. कार्यालयात कार्यरत असलेल्या ममता ठाकूर हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या संबंधांमुळे ती नेहमी संतोषकडे पैशांची मागणी करत असे. ती पैशांसाठी त्याला ब्लॅकमेलही करत होती, ज्यामुळे संतोष नेहमी त्रस्त असायचा. याच कारणामुळे इतर तीन युवकही त्याला मानसिक त्रास देत होते. याच कारणामुळे संतोषने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने याबाबत एक सुसाइड नोट देखील सोडली होती, ज्यात चार आरोपींच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने केला होता.
संतोषच्या आत्महत्येची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुसाइड नोट आणि मृताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही आरोपी अटक झालेला नाही.