शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख शेती सातबारांवर कर्जाचा बोजा

By admin | Updated: December 20, 2014 22:31 IST

जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांपैकी ९० टक्के प्रमाण असणाऱ्या ४ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ६८ हजार १८६ सातबारा कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्ज फेडल तर औजार कर्ज,

गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांपैकी ९० टक्के प्रमाण असणाऱ्या ४ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ६८ हजार १८६ सातबारा कायम कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. पीककर्ज फेडल तर औजार कर्ज, विविध योजनांचे कर्ज, मुलांच्या शिक्षणाचे कर्ज आदी कर्जाचा बोजा चढत असल्याने या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार ही चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यात अल्प, अत्यल्प व कमाल भूधारक शेतकऱ्यांची संख्या ४,५३,९७४ आहे. यापैकी यांनी धारण केलेले क्षेत्र ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टर इतके आहे. तालुकानिहाय पाहता अमरावती तालुक्यात ३४ हजार १७२ शेतकरी आहेत. त्यापैकी २१ हजार ३०० शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा आहे. भातकुली तालुक्यात ३१ हजार ७८३ शेतकरी आहेत. यापैकी २४ हजार ७०६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही. तिवसा तालुक्यात २५ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या १८ हजार ११० सातबारांवर कोठल्या न कोठल्या कर्जाचा बोजा चढलेला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात २३ हजार ६५४ शेतकरी आहेत. यापैकी १७ हजार ७८० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात ३१ हजार ५९२ शेतकरी आहेत. यापैकी २७ हजार १६० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३९ हजार ५ ६७ शेतकरी आहेत. यापैकी ३४ हजार ८७० शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे.
मोर्शी तालुक्यात ४० हजार ९९८ शेतकरी आहेत. त्यापैकी ३४ हजार ७१४ शेतकऱ्यांवरच्या सातबारावर कर्जाची नोंद आहे. वरुड तालुक्यात ४१ हजार २४० शेतकरी आहे. यापैकी ३६ हजार ४१० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही. अचलपूर तालुक्यात ३७ हजार १४४ पैकी ३१ हजार ९३२ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्ज दाखविले आहे. चांदूरबाजार तालुक्यात ४२ हजार ३६६ शेतकरी आहेत. यापैकी ३७ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाची नोेंद आहे.
दर्यापूर तालुक्यात ४२ हजार ६१९ पैकी ३६ हजार ११३ शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३२ हजार ०७९ शेतकरी आहेत. यापैकी २७ हजार ३१५ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही.
धारणी तालुक्यात १९ हजार ७७४ शेतकरी असून १२ हजार ५७० शेतकऱ्यांच्या सातबारांवर कर्जाचा बोजा आहे. चिखलदरा तालुक्यात ११ हजार २५७ शेतकरी आहेत. त्यापैकी ७ हजार ३०९ शेतकरी कर्जदार आहेत.