शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी होणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या ...

अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या संदर्भातील संदेश पालकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर येतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आतील तरतुदीनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार प्रवेशपात्र शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. आरटीईनुसार कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित उत्साहित शाळेत २५ टक्के इतक्या जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठी एकाच टप्प्यात लॉटरी ७ एप्रिल रोजी काढण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉटरी प्रक्रियाही नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरावर काढण्यात आली आहे. प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला तसेच विद्यार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे ४० टक्क्यांपेक्षा जास्‍त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बॉक्स

१५ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा

प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची यादी १५ एप्रिल रोजी संकेतस्थळ उपलब्ध होणार आहे. प्रवेशाबाबत सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रवेशाबाबत शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.