शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लाईफलाईन ओरिएंटलला सील

By admin | Updated: December 16, 2015 00:18 IST

आकर्षक कमिशन आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिटेडच्या...

दोन संचालक ताब्यात : संगणकासह दस्तऐवज जप्तअमरावती : आकर्षक कमिशन आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावाचे प्रलोभन दाखवून ग्राहकांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिटेडच्या स्थानिक कार्यालयाला मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सील ठोकले. याप्रकरणी कंपनीच्या नाशिक येथील संचालकासह स्थानिक संचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यालयातून संगणकासह महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांनी जप्त केला. उल्लेखनीय म्हणजे माध्यमांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी अमरावतीत आलेले नाशिक येथील संचालक एस.बी. शिरोडे हे अलगदच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याशिवाय सुरेश राऊत (रा. कॅम्प, अमरावती) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४२० आणि चिटफंड मनी सर्क्युलेशन अ‍ॅक्टच्या ३,५,६, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळई ७ वाजताच्या सुमारास शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे व त्यांच्या पथकाने खापर्डे बगिच्या स्थित मोरेश्वर प्लॉझामधील लाईफलाईन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स लिमिडेटच्या कार्यालयामध्ये धाड टाकली. सुरेश राऊत हा या कंपनीचा मास्टर मार्इंड असल्याची माहिती उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. अधिक सदस्य बनवून कमिशन देण्याची बतावणी करून शहरात कंपनीने एक हजारापेक्षा अधिक ग्राहकांकडून प्रत्येकी २ हजार २०० रुपये उकळले. मात्र, त्यानंतर परताव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने काही महिला ग्राहकांनी तक्रार केली आहे.