शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’तून तीन वर्षांत १३०० रूग्णांना जीवदान

By admin | Updated: April 2, 2016 00:06 IST

निरोगी महाराष्ट्र, प्रगत राष्ट्र अशी संकल्पना घेवून सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेने तीन वर्षात ...

धामणगाव तालुका अव्वल : चार कोटी रुपयांचा खर्चधामणगाव (रेल्वे) : निरोगी महाराष्ट्र, प्रगत राष्ट्र अशी संकल्पना घेवून सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेने तीन वर्षात तालुक्यातील १ हजार २९६ रूग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे़ कर्करोग, किडनी, हृदयरोग अशा दुर्धर आजारावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली़ ४ कोटी रूपये रूग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यात आले आहे़दारिद्रय रेषेखालील कुटूंबाना चांगला उपचार खासगी रूग्णालयाच्या सहाय्याने मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली़ तालुक्यातील तब्बल १ हजार २९६ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे़ मागील तीन वर्षात हृदयरोगाने पीडित रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली़ किडणी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ या रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर या रूग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे़ आपल्या जीवनात दैनंदिन कोणत्या घडामोडी घडणार, याची पुसटशी कल्पना नसताना तब्बल ८४ जणांचे अपघात यावर्षात झाले़ काहींना औषधोपचाराने तर तब्बल ४० अपघातग्रस्त रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्याने आज या रूग्णांना चालणे, धावणे शक्य झाले आहे़ धकाधकीच्या जीवनात आज माणूस स्वत:कडे लक्ष देणे विसरले आहेत़ मुत्रपिंडानेग्रस्त ६२ रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ हाडाचे विकार तालुक्यातील १७८ रूग्णांना आहेत़ यापैकी ६९ रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली़ १९२ बालकांवर विविध शस्त्रक्रियाद्वारे उपचार करण्यात आले तर तीनशे महिलांना विविध आजारांनी ग्रस्त असताना १८७ महिलांवर विविध पध्दतीने शस्त्रक्रिया करून जीवनदान देण्यात आले आहेत़ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदायिनी ठरली. येथे होतो उपचार जिल्ह्यातील सामान्य रूग्णालय, एस़डी़एच-१०० अचलपूर अतिविशेषज्ञ रूग्णालय, स्त्रियांसाठी जिल्हास्तरीय रूग्णालय, डॉ़पंजाबराव देशमुख रूग्णालय, दयासागर रूग्णालय, उच्चतंत्र विविध विशेषज्ञ रूग्णालय व संशोधन केंद्र, पारश्री रूग्णालय, मुरके रूग्णालय, सुयश रूग्णालय, श्री संत अच्युत महाराज ह्दय रूग्णालय,अरोरा कॅन्सर हॉस्पीटल येथील रूग्णालयात, राजीवगांधी जिवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळत आहे़ पिवळे तथा केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा हे कार्डधारक जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. तालुक्यातील सर्वाधिक रूग्ण यवतमाळ, वर्धा, नागपूर ,मुंबई येथे पाठविण्यात येते़ जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी ही महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे़ तालुक्यातील १ हजार२९६ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे़- राजेंद्र जगताप, आरोग्यमित्र, धामणगाव रेल्वे राजीव गांधी जिवनदायी योजना