शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST

चांदूरबाजार तालुक्यात कारंजा (बहिरम) येथे पिता-पुत्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यावर लोखंडी घन मारुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अचलपूर येथील अतिरिक्त

कारंजा बहिरम येथील घटना : भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची हत्याअचलपूर : चांदूरबाजार तालुक्यात कारंजा (बहिरम) येथे पिता-पुत्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यावर लोखंडी घन मारुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कारंजा (बहिरम) येथील विनोद उर्फ दादू मोतीराम कास्देकर, असे न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या हत्येतील आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात न्यायालयात दाखल दोषारोपत्रानुसार, कारंजा (बहिरम) येथील आरोपी विनोद उर्फ दादू मोतीराम कास्देकर याचा ११ डिसेंबर २०१२ रोजी वडील मोतीराम कास्देकर यांच्यासोबत वाद सुरु होता. या वादात शेजारीच राहणाऱ्या ज्ञानेश्वर बळीराम सातपाने यांनी मध्यस्थी केली. पिता-पुत्रामधील वाद संपुष्टात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु ज्ञानेश्वर सातपाने यांनी भांडणात केलेली मध्यस्थी केलेली आरोपी विनोद कास्देकर याला सहन झाली नाही. त्याने ज्ञानेश्वर यांच्याशी भांडण करुन त्यांच्या डोक्यावर लोखंडी घनाने हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर सातपाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वरचा भाऊ रमेश बळीराम सातपाने यांनी शिरजगाव कसबा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.शिरजगावचे तपास अधिकारी आय. एस. पठाण यांनी याप्रकरणी तपास करुन हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी अचलपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात ठेवले. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण घेतली. पोलिसांचा तपास व सरकारी पक्षातर्फे साक्षीदारांच्या बयाणावरुन न्यायालयाने आरोपी विनोद कास्देकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे शरद काळमेघ यांनी कामकाज पाहिले. (तालुका प्रतिनिधी)