शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमानेच दिली डॉक्टरांना खोटी माहिती

By admin | Updated: September 10, 2016 00:10 IST

अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारेच अजय पाय घसरून पडल्याची माहिती आश्रमाने त्याच्या आईला दिल्याचे ...

दिशाभूल : प्राथमिक केंद्रात अंतिम निदान शक्य नाहीअमरावती : अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारेच अजय पाय घसरून पडल्याची माहिती आश्रमाने त्याच्या आईला दिल्याचे निवेदन आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी अमरावती येथील पत्रपरिषदेत केले होते; तथापि आश्रमानेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजीव पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. अजय वणवे या विद्यार्थ्याचा शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात दगडाने ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर अजय स्वच्छतागृहात पाय घसरून पडला, अशी धादांत खोटी माहिती आश्रमाने त्याच्या आईला दिली होती. हा खोटेपणा अखेरपर्यंत जपला गेला. डॉ.राजीव पाटील यांनी ३० जुलैच्या मध्यरात्रीनंतरचा इत्यंभूत घटनाक्रम 'लोकमत'ला सांगितला. डॉ.पाटील म्हणाले, ३० जुलैच्या रात्री ३.५५ वाजता अजय वणवे या मुलाला बेशुद्धावस्थेत अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनातून आणण्यात आले. अजयच्या नाकाला आणि वरच्या ओठाला गंभीर दुखापत झाली होती. मुर्च्छितावस्थेत जुजबी प्राथमिक तपासणी केली. त्याच्या जखमांचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. त्याच्या चेहऱ्याचे हाडदेखील फ्रॅक्चर असू शकेल, अशी शक्यता मला त्यावेळी वाटली. लहानग्या अजयला त्यावेळी आवश्यक असणाऱ्या उपचारांसाठीची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे त्याला वेळ न दवडता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करणे अत्यंत आवश्यक होते. काही इंजेक्शन्स मी त्याला दिली. तत्पूर्वी आवश्यक प्रक्रियेनुसार रुग्ण आरोग्य केंद्रात दाखल होताच काही नोंदी घ्याव्या लागतात. अंजनसिंगीचे आरोग्य केंद्र हे मुळातच प्राथमिक उपचार केंद्र असल्यामुळे अंतिम इलाज आणि निदान मुळीच शक्य नाही. गंभीर रुग्णांना लागलीच 'स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये रवाना करणे आवश्यक असताना वैद्यकीय नोंदींसाठीच्या परीक्षणात वेळ व्यर्थ जाऊ नये यासाठी आम्ही, रुग्णांसोबतच्या मंडळींनाच जखम कशी झाली, हे विचारतो. रुग्णासोबत असलेली व्यक्ती सत्यच सांगेल, हे अर्थात्च गृहित असते. अजयच्या प्रकरणातही हाच प्रघात पाळला गेला. सोबतच्या व्यक्तिंना जखम कशामुळे झाली, हे मी विचारले. पाय घसरून तो बाथरूममध्ये पडला, अशी स्पष्ट माहिती सोबतच्या व्यक्तिंनी दिली. तीच नोंद मी घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतलेली नोंद ही अंतिम निदानाच्या रकान्यात घेतलेली नसते. ती तात्पुरत्या निदानाच्या रकान्यात घेतली जाते. मीदेखील त्याच रकान्यात नोंद घेतली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निदानाचा दिला जात असलेला हवाला अयोग्यच ठरतो, असेही मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.