तिवसा येथे उभारले वाचनालय, अभ्यासिका केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST2021-04-17T04:11:58+5:302021-04-17T04:11:58+5:30

तिवसा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत मागासवर्गीय निधीतून मंजूर ...

Library, Study Center at Tivasa | तिवसा येथे उभारले वाचनालय, अभ्यासिका केंद्र

तिवसा येथे उभारले वाचनालय, अभ्यासिका केंद्र

तिवसा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अंतर्गत मागासवर्गीय निधीतून मंजूर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा वरखेडचे माजी सरपंच दिलीप भुयार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सरपंच राहुल तायडे, सुखदेव मनोहर, बाळू हरणे उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके यांचा सत्कार करण्यात आला. अर्पित काळबांडे, परिमल जवंजाळ, निखिल काळबांडे, सुमीत दिघडे, आकाश बनसोड, रवि खंडारे, संघर्ष खडसे, मान्यता मनोहर आदींना पुस्तके वितरित करण्यात आले. यावेळी अजाबराव दिघडे, राजू खडसे, दिनकर बोके, हेमंत मनोहर, प्रफुल्ल गडलिंग, दिलीप कावलकर, रवि मनोहर उपस्थित होते.

Web Title: Library, Study Center at Tivasa