शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.निवडणुकीत विधानसभेचे गणित

By admin | Updated: September 21, 2014 23:42 IST

मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी उशिरा रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेऊन गत

महापालिका पॅटर्न : संजय खोडके यांची भूमिका ठरली महत्त्वाचीगणेश वासनिक - अमरावतीमिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी उशिरा रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेऊन गत निवडणुकीतील पराभवाचा बदला घेतला. रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली. काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर वऱ्हाड विचारमंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्ष म्हणून निर्वाचित झाले. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊन सत्तेचे समीकरण जुळून येईल, असे संकेत होते. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित जुळविण्यात काँग्रेसचे नेते सरस ठरले, हे विशेष.जिल्हा परिषदेत ५९ सदस्य संख्या आहे. यात काँग्रेसचे सर्वाधिक २५ सदस्य आहेत. काँग्रेसला सत्तेसाठी केवळ ५ सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना, प्रहार, बसपा यांच्याशी अभद्र युती करुन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. ही बाब त्यावेळी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला हिसका दाखविण्याच्या प्रतीक्षेत काँग्रेसचे नेते होते. अशातच जिल्हा परिषदेत ८ सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली. संजय खोडके यांनी राष्ट्रवादीच्या ८ सदस्यांपैकी ५ सदस्य आपल्या तंबूत खेचून आणले. एवढेच नव्हे, तर या पाच सदस्यांचा जिल्हा परिषदेत वऱ्हाड विचार मंच या नावाने स्वतंत्र गट स्थापन करुन नवी यशस्वी राजकीय खेळीदेखील केली. सत्तास्थानी असलेल्या राष्ट्रवादीला या खेळीमुळे जबर हादरा बसला. राष्ट्रवादीत तत्कालीन अध्यक्षांसह केवळ तीनच सदस्य राहिलेत. त्यामुळे ऐनवेळी समीकरण बदलले आहे.