शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

रणभूमीतील दिग्गज; अमरावतीची ‘ताईंचा जिल्हा’ ही ओळख कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:26 AM

देशपातळीवरील राजकारणात अमरावती जिल्ह्यातील स्त्रीशक्तीची छाप राहिली आहे. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन महिला खासदाराची कारकीर्द बहारदार अन् कामगिरी दमदार राहिली आहे.

ठळक मुद्देस्त्रीशक्तीला काँग्रेसचेच बळदेशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचा बहुमान

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशपातळीवरील राजकारणात अमरावती जिल्ह्यातील स्त्रीशक्तीची छाप राहिली आहे. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन महिला खासदाराची कारकीर्द बहारदार अन् कामगिरी दमदार राहिली आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचा मान मिळालेल्या प्रतिभाताई पाटील या अमरावतीकरच... किंबहुना महिला खासदारांच्या दिमाखदार कामगिरीमुळेच जिल्ह्यास ‘ताईंचा जिल्हा’ अशी कायम ओळख राहिली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघ सुदामकाकांचा दोन वर्षांचा कालखंड वगळता १९५२ ते १९९६ पर्यंतच काँग्रेसचा गड राहिला. त्यानंतर अनेक स्थित्यंतर मतदारसंघाने अनुभवले. विशेष म्हणजे, ज्या तीन महिला शक्तींना जिल्ह्याने बळ दिले, त्यांना उमेदवारी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिली आहे. महिला सक्षमीकरणाच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या अन्य राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील स्त्रीशक्तीला राजकारणात बळ दिलेले नाही, हे वास्तव आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सी.पी अ‍ॅन्ड बेरार अर्थात मध्य प्रांत असताना अमरावतीचे खासदार डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख खासदार झाल्यात व जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान मिळविला. सन १९८० ते १९८९ या कालावधीत सलग दोन वेळा उषाताई चौधरी जिल्ह्याच्या खासदार राहिल्या. त्यांच्या दमदार कारकीर्दीची राज्याच्या राजकारणावर छाप राहिली. त्यानंतर सन १९९१ ते १९९६ या कालावधीत प्रतिभाताई पाटील जिल्ह्याच्या खासदार झाल्यात न त्यांच्या दमदार कारकिर्दीने देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होण्याचा बहुमानदेखील मिळविला.जिल्ह्यातील महिला खासदारांची अशी देदीप्यमान कारकीर्द राहिली आहे. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर बुलडाण्याचे खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. अलीकडच्या दोन दशकात २०१४ मध्ये अमरावती मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती.

अमरावती पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्लापूर्वीचा मध्य प्रांत असताना जिल्ह्याचे पहिले खासदार होण्याचा बहुमान १९५१ मध्ये काँग्रेसचे डॉ. पंजाबराव देशमुख यांना मिळाला. त्यांच्यानंतर १९५१ ते १९५७ कृष्णराव देशमुख व पुन्हा १९५७ ते १९६५ डॉ. पंजाबराव देशमुख आणि त्यांच्या निधनानंतर १९६५ ते १९६७ विमलाबाई पंजाबराव देशमुख खासदार झाल्या. १९६७ ते १९७७ के.जी. देशमुख , १९७७ ते १९८० नाना महादेव बोंडे, १९८० ते १९८९ उषाताई चौधरी, १९८९ ते १९९१ सुदामकाका देशमुख (भाकपा) व पुन्हा काँग्रेसच्याच प्रतिभाताई पाटील ह्या १९९१ ते १९९६ कालावधीत खासदार राहिल्या. यानंतर काँग्रेसला यशाने हुलकावणी दिली. हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे.

सुदामकाकांनी थोपवला काँग्रेसचा रथतब्बल चार दशकानंतर सुदामकाका देशमुख या भाकपच्या लोकनेत्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातला विजयी रथ थोपवला. ‘तुमचा गेरू अन् तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा’ या हाकेला घराघरांतून साथ दिली गेली. विशेष म्हणजे, युवकांनी घराघरांतून एक- एक रुपया गोळा करून वर्गणी केली अन् निगर्वी व्यक्तिमत्त्वाने ऐतिहासिक विजय संपादीत केला. यानंतर पुन्हा प्रतिभाताई पाटील यांनी काँग्रेसची विजयी पताका उंचावली. त्यानंतर मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आलेला नाही.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटील