शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

डाव्या हाताची तर्जनी लोकसभेसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:38 PM

जिल्ह्यातील खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्याची ओळख म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई लावण्यात येणार आहे, तर लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या हाताच्या तर्जनीला लोकसभा निवडणुकीत शाई लावण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश राज्याचे निवडणूक आयुक्तांनी बुधवारी दिलेत.

ठळक मुद्देनिवडणूक आयुक्तांचे निर्देश : खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीत उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्याची ओळख म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई लावण्यात येणार आहे, तर लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या हाताच्या तर्जनीला लोकसभा निवडणुकीत शाई लावण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश राज्याचे निवडणूक आयुक्तांनी बुधवारी दिलेत.भारत निवडणूक आयोगाद्वारा राज्यातील ४८ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारीला ५५७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक व ८२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचाची पोटनिवडणूक तसेच २१ फेब्रुवारीच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. याव्यतिरिक्त पालघर, सिंदखेड राजा व लोणार नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सर्व निवडणुकीसाठी २४ मार्चला मतदान होणार आहे. जिल्ह्यात खेल देवमाळी या ग्रामपंचायतीची निवडणूक या प्रक्रितेत होणार आहे. आयोगाच्या ९ आॅक्टोबर २०१२ चे आदेशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मतदाराची ओळख पटल्यावर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न मिटणारी पक्की शाई लावण्याचे निर्देश मतदान केंद्राध्यक्षांच्या अभ्यास पुस्तिकेत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २४ मार्चचे निवडणुकीत कोणत्या बोटाला शाई लावावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी सायंकाळी निवडणूक आयुक्तांनी याचे निरसन केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात लोकसभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीतदेखील मतदाराची ओळख पटल्यावर त्याचे डाव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई लावण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमध्ये कुठलाच पेच निर्माण होऊ नये, यासाठी २४ मार्चला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या डाव्या हाताचे तर्जनीला न मिटणारी पक्की शाई न लावता उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचे निर्देश देण्याची विनंती उपसचिव अ.ना. वळवी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना केली होती. त्यानुसार निवडणूक आयुक्तांनी बुधवारी निर्देश जारी केले आहेत.