शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाची आरक्षण सोडत २ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यामध्ये १६ ग्रामपंचायतींसह इतर ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी ...

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. यामध्ये १६ ग्रामपंचायतींसह इतर ठिकाणी एका सदस्यपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ४७७ सदस्यपदे अविरोध निवडून आलेली आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये ४३९७ सदस्यपदांसाठी १९४८ मतदान केंद्रांवर ७.४० लाख मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी पश्चात ज्या गटाचे बहुमत आलेले आहे त्या गटात सरपंचपदासाठी अनेक दावेदार समोर आले आहेत. मात्र, आरक्षण कुण्या प्रवर्गात यावर सर्व अडले आहे. त्यामुळे इच्छुकांकडून सरपंचपदाचे आरक्षणाची सातत्याने विचारणा होत आहे. आता प्रतीक्षा आणखी पाच दिवस ताणल्या जाणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारा तालुकास्तरावर २ फेब्रुवारीला सरपंचपदाची सोडत काढण्यात येईल व ४ तारखेला या महिला राखीव सरपंचपदांसाठी तालुकास्तरावरच सोडत काढण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

बॉक्स

मार्च महिण्यातील आरक्षण स्थिती

जिल्ह्यात मार्च महिण्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. यानंतर कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. यामध्ये ४८७६ सदस्यपदांपैकी २६९२ पदे महिलांसाठी राखीव होती. यामध्ये सर्वसधारणमध्ये २०१० यामध्ये ११७१ महिला राखीव, अनु.जातीमध्ये १०४६ पदे यामध्ये ५५९ महिलांसाठी राखीव, अनु, जमातीसाठी ७३२ पदे यामध्ये ३५० महिलांसाठी व नामाप्रमध्ये ११५७ पदे यामध्ये ६१२ महिलांसाठी राखीव अशी स्थिती होती.