शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी जंगलात सोडले; गर्भवतीवर सामूहिक अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:43 IST

हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे.

 चांदूर रेल्वे, दि. 18 -  हुड्यांची मागणी करीत हात व डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात सोडून देणा-या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार २४ वर्षीय पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत केली आहे. याप्रकरणी हुंडा मागणा-या पतीसह सासू, सासरे, ननंदेसह चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या सासरची मंडळी जडी-बुटी विकण्याचा व्यवसाय करतात. पती भानूसिंग चितोडिया, सासू कश्मिरीबाई ऊर्फ लक्ष्मी चितोडिया, सासरे शेरसिंग चितोडिया व ननंद लाली चितोडिया २५ मार्च २०१७ रोजी एका जंगलातील अज्ञात स्थळी घेऊन गेले. जंगलात जाऊन तेथून त्यांनी पीडितेच्या माहेरच्या मंडळीना फोन लावून पैशांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याचे उत्तर मिळाल्याने या ठिकाणी वाद झाला. पीडिता गर्भवती असताना भानूसिंग याने चाकूच्या धाकेवर मारहाण केली, त्यांनंतर तिच्या डोळयावर पट्टी व हात पाय बांधून तसेच सोडून दिले. दरम्यान तीन-चार अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केले. आपला जीव वाचवून पीडिता रायपूर (छ.ग.) येथे पोहचल्यावर काही नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने एका मृत अभ्रकास जन्म दिला. या नंतर पीडितेने चांदूर रेल्वे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर भादंवि ३६५,३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चैताली गवई करीत आहे.

आरोपी परराज्यातील असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणी घेण्यात आला. त्यांना अटक करण्यासाठी परवाणगी आवश्यक आहे. याबाबत त्वरीत अटकेची कार्यवाही करण्यात येईल.- ब्रह्मा शेळकेपोलीस निरीक्षक, चांदूर रेल्वे