शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांवरही ‘एलबीटी’चा बोझा

By admin | Updated: August 21, 2014 23:31 IST

व्यापाऱ्यांकडून शहरात आणल्या जाणाऱ्या मालावर महापालिकेच्या एलबीटी पथकातर्फे एलबीटी आकारणे सुरू आहे. एलबीटीला व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध असताना आता वीज ग्राहकांवरही एलबीटीचा

शासन अध्यादेश जारी : आॅगस्ट महिन्याच्या देयकांत समावेशअमरावती : व्यापाऱ्यांकडून शहरात आणल्या जाणाऱ्या मालावर महापालिकेच्या एलबीटी पथकातर्फे एलबीटी आकारणे सुरू आहे. एलबीटीला व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध असताना आता वीज ग्राहकांवरही एलबीटीचा बोझा येणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याचे वीज देयक विविध कर आकारणीसह एलबीटी आकारुन ग्राहकांना मिळणार आहे. ज्या महापालिकांमध्ये एलबीटी (स्थानिक कर) आकारला जातो त्या हद्दीत वीज वितरण कंपनीच्या सेल आॅफ एनर्जी, एनर्जी चार्जेस, एफसी (फ्यूल एडजस्टमेंट कॉस्ट) तथा अन्य एनर्जी चार्जेसवर २ टक्के प्रमाणे स्थानिक संस्था कर आकाण्यासंदर्भात राज्य शासनाने २० फेब्रुवारी २०१४ रोजी अध्यादेश जारी केला आहे. भविष्यात महावितरण कंपनी कोणत्याही प्रकारच्या एनर्जी कम्पोनंटचा अवलंब करीत असेल तर त्यासाठी एलबीटीची वसुली वीज ग्राहकांकडून करावी, असा शासनाच्या अध्यादेशात स्पष्ट उल्लेख आहे. वीज वितरण कंपनी विद्युत ग्राहकांकडून सेल टॅक्स, इलेक्ट्रीसिटी ड्युटी आतापर्यंत वसुल करीत होती. आता एलबीटीचा भरणाही वीज ग्राहकांना करावा लागणार आहे. शहरात एक लाख ६५ हजार ग्राहकशहरातील वीज ग्राहकांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार एवढी आहे. यातील काही ग्राहकांचा वीज पुरवठा थकित देयकामुळे खंडित करण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्याचे वीज देयक ग्राहकांच्या हाती आता एलबीटी आकारुन मिळणार आहे.