थाेडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST2021-05-26T04:13:34+5:302021-05-26T04:13:34+5:30

अचलपूर : तालुक्यातील पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राची नुकतीच जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी पाहणी केली. या ठिकाणी ...

The latest news | थाेडक्यातील बातम्या

थाेडक्यातील बातम्या

अचलपूर : तालुक्यातील पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राची नुकतीच जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी पाहणी केली. या ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे. सदर आरोग्य केंद्राच्या कामकाजाचीही त्यांनी माहिती घेतली.

..................................................

बांधकाम विभागासमोर वाहनांच्या रांगा

अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागासमाेर चारचाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसराला वाहनतळाचे स्वरूप आल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे.

.................................................................

अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बसच्या फेऱ्या

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी आता धावू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात कर्तव्यावर जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

.................................

बाजार समितीत धान्याची आवक

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेतकरी वर्ग शेतमाल बाजार समितीत विक्रीस आणत आहे. त्यामुळे मंगळवारी येथील बाजार समिती समोर मालवाहू वाहनांची रांग लागली होती.

Web Title: The latest news