शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिवांना उशिरा सुचले शहाणपण

By admin | Updated: August 23, 2014 23:42 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

खळबळ : कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्षअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी कुलगुरु मोहन खेडकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या लहरीपणावर बंदी लावण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्या अनुषंगाने कार्यालयीन सूचनेचे पत्र सर्व विभाग प्रमुखांना देऊन कर्मचाऱ्यांना सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहाण्याचे फर्मान सोडले होते. या सूचनेवरुन तोच धागा घरुन कुलसचिव डी. के. जोशी यांनी सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंद वहीची पाहणी सुरु केली आहे. त्यामुळे कुलसचिव स्वत:च उशिरा येतात. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांकडून वेळेवर उपस्थित राहण्याची अपेक्षा करीत आहेत, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षमतेचा बोजबारा वाजल्याचे चित्र आहे. अनेक वेळा विद्यापीठाविरुध्द ताशेरे ओढले जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यावर लागलेले विविध आरोप, कुलसचिवांचे कारनामे, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, आॅनलाईन प्रक्रिया, बिंदू नामावली प्रलंबित, पत्रकारावर वॉच, कर्मचाऱ्यांच्या अपमान, मराठी भाषकांचा अपमान, संगणक घोटाळा, विद्यार्थ्यांच्या समस्या अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात विद्यापीठ सापडले आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाचा कामकाज सुरळीत न झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता कुलसचिवांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले असून कर्मचाऱ्यांचे हजेरी नोंदवही तपासणी केली जात आहे.मागील कित्येक वर्षांपासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. रिक्त पदे तसेच पद्दोन्नतीकडे अजूनही दुर्लक्षच आहे, अशा अनेक बाबींवर लक्ष वेधण्याचे सोडून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. विद्यापीठात कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे,हे विषेश. (प्रतिनिधी)