पतीशी भेट शेवटची; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:00 IST2024-09-24T13:55:37+5:302024-09-24T14:00:52+5:30
Amravati : अमरावतीच्या भीषण अपघातात मृतांच्या ३ महिलांमध्ये पल्लवी सुद्धा एक

last meeting with husband; The joy of 'that' sweet news was taken away by accident
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये डॉ पल्लवी कदम (३२) यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा ११ जुलैला एमआयडीसी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला. आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड वार्तादेखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले हे दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते. परंतु, अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांनादेखील हिरावून नेले.
डॉ. पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील दोन वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. मूळच्या आष्टी (ता. वर्धा) येथील त्या रहिवासी. लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्य सेवा देत होत्या. मात्र, विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू केला. कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या पहाटे ५ वाजताच्या खासगी बसने नेहमीच प्रवास करीत होत्या.
आठ दिवसांपूर्वीच पल्लवी आणि राहुल या दाम्पत्याच्या जीवनवेलीची कळी खुलल्याची गोड वातदिखील त्यांना समजली होती. सोमवारी राहुल त्यांना खासगी ट्रॅव्हल्सवर सोडले. त्यातेली स्मिताम्य करीत त्यांनी पतीला निरोप दिला. ती त्यांची अखेरची भेट ठरली. डॉ. पल्लवी यांचा मृतदेह सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर घरी आणण्यात आला. त्यांच्यावर शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षकाला हलविले
नागपूरला ट्रॅव्हल्समधून एकूण सात शिक्षक मेळघाटात कर्तव्यावर निघाले होते. यातील नारायण पुरी नामक शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. एका शिक्षकावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात, तर एका महिला शिक्षिकेवर अमरावतीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शिक्षिकेच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
पाच वर्षांची चिमुकली अन् आईचीही प्रकृती गंभीर
गायत्री मावस्कर या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर आहे. तिला सुरुवातीला नागपूर रेफर करण्याचे सांगण्यात आले होते. या चिमुकलीसह तिची आई काली मावस्करही गंभीर जखमी आहे.
तीन महिन्यांपूर्वीही उलटली होती बस
या मार्गावर सतत अपघात घडत असतो. विशेष म्हणजे, याच चावला कंपनीची बस तीन महिन्यांपूर्वी घटांग गावाजवळ वळणावर उलटली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही