शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अपंग तरुणाच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा बिझिलँडवर ‘प्रहार’

By admin | Updated: September 13, 2016 00:25 IST

गतवर्षी बिझिलँडमध्ये काम करताना अपघात होऊन कायम अपंगत्व आलेल्या तरुणाच्या न्यायासाठी...

संचालकाला खडसावले : त्वरित नुकसान भरपाई देण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासननांदगाव पेठ : गतवर्षी बिझिलँडमध्ये काम करताना अपघात होऊन कायम अपंगत्व आलेल्या तरुणाच्या न्यायासाठी आ.बच्चू कडू यांनी शुक्रवारी बिझिलँडवर धडक दिली. नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिझिलँडच्या संचालकांना खडसावल्यानंतर त्यांनी त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.येथील दिनेश शेंडे नामक कामगार बिझिलँड कन्स्ट्रक्शन येथे कार्यरत होता. गतवर्षी स्लॅबवरून पडून तो जखमी झाला व त्याला कायमचे अपंगत्व आले. उपचाराचा खर्च कंपनीने केला. मात्र, त्यानंतर नाममात्र रक्कम देऊन त्या तरूणाची बोळवण करण्यात आली. पुढील खर्च देण्यास संचालकांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्या तरूणाने सामाजिक कार्यकर्ते पंकज शेंडे व इतर कार्यकर्त्यांनी याची माहिती आ.बच्चू कडू यांना दिली बुधवारी त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत बिझिलँड गाठले. संचालक श्याम पिंजाणीसह इतर संचालकांना तरुणाच्या अपंगत्वाला जबाबदार ठरवून नुकसान भरपाईस विलंब का, असा सवाल आ.कडूंनी फटकारल्यानंतर संचालकांनी नुकसान भरपाई देणार असल्याचे स्पष्ट केले.कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने संचालकांनी खबरदारीने काम करावे, असा सल्लाही आ. कडू यांनी दिला. दोन दिवसांत संचालक व कंत्राटदार मिळून अधिकाधिक रक्कम देण्याचे आश्वासन श्याम पिंजाणी यांनी उपस्थितांना दिले. यावेळी प्रहारचे छोटूमहाराज वसू, पंकज शेंडे, चंदू खेडकर, किशोर नागपुरे, अमिन यादव, गणेश मुळे, राम चंदेल, संदीप मदनकार, श्याम अकोलकर, किशोर राऊत आदींची उपस्थिती होती.