पालकमंत्री : चौक, मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवाअमरावती : आगामी गणेशोत्सव व बकरी ईद उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवा. समाजातील बहुतांश लोक सृजन असतात. पण काही विघ्नसंतोषी लोकांमुळे उत्सवाला गालबोट लागते. उत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गुंडागर्दी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घेण्यात आला. बैठकीला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणचे अधीक्षक अभियंता, उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार व ठाणेदार, सर्व मुख्याधिकारी, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.चौका-चौकांत व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कार्यक्रमस्थळी वीज व पाण्याची सुविधा, उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण होणार नाही, विर्सजनाच्या ठिकाणी चिखल होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात महसूल प्रशासनाने व पोलीस विभागाने शांतता समितीची स्थापना करून जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी समितींच्या बैठकी घ्याव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.सार्वजनिक बांधकाम विभागाने मिरवणुकीच्या व विसर्जनाच्या मार्गातील नादुरुस्त रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी. परिवहन विभागाने नवीन वाहनांना व शिकाऊ उमेदवारांना विसर्जन काळात वाहन चालविण्यास बंदी घालावी. महावितरण विभागाने उत्सवादरम्यान वीज व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)
उत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था ठेवा
By admin | Updated: September 5, 2016 00:27 IST
आगामी गणेशोत्सव व बकरी ईद उत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवा.
उत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था ठेवा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}