शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आरागिरण्यांवर धाडसत्र सुरू; २० हजारांचे लाकूड जप्त

By admin | Updated: October 10, 2015 00:32 IST

आडजात वृक्षांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शुक्रवारी आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले.

अवैध कटाई : वलगावच्या नेहा वूडच्या संचालकावर गुन्हेअमरावती : आडजात वृक्षांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शुक्रवारी आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. यात वलगाव मार्गावरील ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’च्या संचालकांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले असून २० हजार रुपये किमतीचे आंबा वृक्षाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.वनविभागाने आडजात वृक्ष कटाईची परवानगी दिली नसताना ही कत्तल करुन ते शहरातील आरागिरण्यांमध्ये आणले जात असल्याची गुप्त माहिती वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रदीप लाकडे यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आरागिरणी वनपाल योगिता मगर, वडाळीचे वनपाल विजय बारब्दे यांच्या नेतृत्वात आरागिरण्यांवर धाडसत्र राबविले. त्यानुसार वलगाव मार्गावरील ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’च्या संचालकांनी विनापरवानगी १.२७९ इतक्या आंबा वृक्षांची कत्तल करुन लाकूड आणल्याचे स्पष्ट झाले.महिला वनपालाची कारवाईअमरावती : आरागिरणीबाहेर हे लाकूड पडले असताना परवान्याबाबत वनधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आरागिरणी संचालक परवाने दाखवू शकले नाहीत. त्यामुळे आंब्याचे १.२७९ घनमिटर अवैध लाकूड आणल्याप्रकरणी ‘नेहा वूड इंडस्ट्रिज’चे संचालक सय्यद इस्माईल सय्यद बाबा यांच्याविरुध्द वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त लाक डाची बाजारातील किंमत अंदाजे २० हजार रुपये इतकी असल्याचे वनपाल योगिता मगर यांनी सांगितले. आडजात वृक्षांच्या कटाईला परवानगी देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडे असताना आरागिरण्या संचालकांनी अवैध वृक्षकटाईचा सपाटा सुरु केला आहे. दिवसाढवळ्या ट्रकद्वारे अवैध लाकूड शहरात आणले जात असल्याचे चित्र आहे. आडजात वृक्षकटाईला परवानगी नसताना शहरात अवैध लाकूड येते कसे?, हा संशोधनाचा विषय आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के.लाक डे, आरागिरणी वनपाल योगिता मगर, वनपाल विजय बारब्दे, बाबूराव येवले यांनी केली आहे.