इर्विनच्या डॉक्टरांना हवी शस्त्रधारी सुरक्षा
By Admin | Updated: August 2, 2016 23:56 IST2016-08-02T23:56:03+5:302016-08-02T23:56:03+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर असुरक्षित असून त्यांना शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा द्यावी,...

इर्विनच्या डॉक्टरांना हवी शस्त्रधारी सुरक्षा
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर असुरक्षित असून त्यांना शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा द्यावी, अशी मागणी मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या नेत्तृत्वात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे निवेदनातून केली.
रुग्णालयात जिल्ह्याभरातून शेकडो रुग्ण रोज दाखल होतात. त्यातच एमएलसीच्या प्रकरणात डॉक्टरांना हाताळावे लागतात. अनेकदा कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नातेवाईक किंवा नागरिकांनी हल्ले केले जातात. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळत नाही. त्या दृष्टीने पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी, शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. यावेळी सी.एस अरुण राऊत, आरएमओ सुभाषचंद्र तितरे, दीपक शेंडे, सुनीता मेश्राम, कडुकार, जाधव,अमोल गुल्हाने, महल्ले, ह्युमने, खराते, फसाटे, उज्वला मोहोड आदी उपस्थित होते.