शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

‘तपास सुरू आहे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले.

ठळक मुद्देगुंता कायम : पोलिसांच्या तपासावर खिळल्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूला पंधरवडा उलटत असताना, त्यांच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. डझनभर लोकांची बयाने, सीसीटीव्ही फुटेज आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचा प्राथमिक निष्कर्ष हाती असताना, डॉ. भट्टड यांच्या मृत्यूची ठोस कारणमीमांसा होऊ शकली नाही. तमाम दर्यापूरकरांच्या नजरा या प्रकरणाकडे खिळल्या असताना पोलिसांकडून येणारे ‘तपास सुरू आहे’ हे पालुपद संशयाला खतपाणी घालणारे ठरले आहे.
दर्यापूर पोलिसांच्या कार्यतत्परतेवर विश्वास ठेवून शिवसेना, मनसे व इतर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत की काय, अशी शंकाही खुलेआम घेतली जात आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी प्रचंड गोपनीयतेचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाबाबत कुणालाही विचारले, तर एकच पठडीतील उत्तर दिले जाते, ते म्हणजे - तपास सुरू आहे. मात्र, त्या तपासादरम्यान काही पुरावे हाती लागलेत का, त्यातून डॉ. भट्टड यांचा मृत्यू नेमका गळफास घेतल्याने झाला की कुणी त्यांना गळफास देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला की अन्य काही, या एकाही प्रश्नाचे उत्तर पंधरा दिवसांनंतरही मिळू शकले नाही.
पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले. तथापि, त्या दिशेने पोलिसांना रोख वळविता आलेला नाही.
पोलीस प्रशासन रेस्टहाऊसलगत असलेल्या आयसीयूमध्ये दाखल काही रुग्णांचे बयान घेणार होती. मात्र, त्यालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. एकंदरीतच या प्रकरणाचा गुंता सुटण्याऐवजी अधिक गडद झाला आहे. सत्य काय ते तातडीने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मेडिकल संचालकाचे बयान के व्हा?
डॉ. राजेंद्र भट्टड यांच्या गोदावरी हॉस्पिटलनजीक असलेल्या सुविधा मेडिकलचे संचालक हरीश अंबादास भैय्या यांनी दर्यापूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. डॉ. भट्टड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आपणाला एका परिचारिकेने सांगितले. त्यांनी आत्महत्या का केली, हे आपणास ज्ञात नसले तरी त्यांच्या मृत्यूची योग्य ती चौकशी व्हावी, असे त्या तक्रारीत नमूद होते. भट्टड यांच्याकडील एक परिचारिका त्यांना फोनद्वारे आत्महत्येची माहिती देत असेल अन् हरीश भैया तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असतील, यावरून डॉ. राजेंद्र भट्टड व त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या स्टाफशी त्यांचे अत्यंत आत्मीयतेचे संबंध अधोरेखित होतात. त्यांनी सर्वप्रथम याबाबत तक्रारही नोंदविली. ते या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. मात्र, दर्यापूर पोलिसांनी त्यांचे बयान नोंदविलेले नाही.

टॅग्स :Deathमृत्यू