गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:18 IST2018-06-25T19:18:20+5:302018-06-25T19:18:46+5:30

अमरावती नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या

Inter Caste Couple Commits Suicide Near Amravati | गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

 अमरावती -  नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
वरूड तालुक्यातील गोरेगाव येथील या युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या आंतरजातीय प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने शनिवार २३ जूनला रात्री ९.३० च्या सुमारास ते घरून पळून गेले. त्यांनी लग्न करण्याचा कायदेशीर प्रयत्न केला. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने ते यशस्वी होऊ शकले नाही. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. वीरेंद्र याने रविवारी रात्री घरी फोन करून 'हा माझा शेवटचा फोन' असल्याचे सांगितल्याने रात्रीपासूनच शोधाशोध सुरू केल्याची चर्चा होती.
  रविवारी रात्री हताश होऊन त्यांनी नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावरील बेनोडा गोरेगाव रस्त्यावरील पुलाजवळील रुळावर झोपून मालगाडीखाली आपली जीवनयात्रा संपविली. बेनोडा पोलिसांना वरूड येथील रेल्वे कर्मचा-यांना काचीकुडा एक्सप्रेसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. छिन्नविछीन्न अवस्थेतील दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.तायडे,ए.एस.आय.भाकरे, हे.काँ.संतोष औंदकर, पो.काँ.दिनेश राऊत करीत आहे.

Web Title: Inter Caste Couple Commits Suicide Near Amravati