शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेअब्रू टाळण्यासाठी चौकशीचे गुऱ्हाळ

By admin | Updated: December 8, 2015 00:06 IST

चोरट्यांसह ट्रक तोडणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा ठपका असलेल्या गुन्हे शाखेशी संबंधित ‘टीप’ प्रकरणात चौकशीची गुऱ्हाळ सुरू आहे.

पोलीस निरीक्षकांसह पाच जणांवर कारवाईची तलवारगुन्हे शाखेतील टीप प्रकरण   अधिवेशन संपल्यावर कारवाई !अमरावती : चोरट्यांसह ट्रक तोडणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा ठपका असलेल्या गुन्हे शाखेशी संबंधित ‘टीप’ प्रकरणात चौकशीची गुऱ्हाळ सुरू आहे. तीन आठवड्यांनंतरही आयुक्तांनी या चौकशीबाबत ठोस भूमिका किंवा वस्तुनिष्ठ निष्कर्ष जाहीर केलेला नाही. त्यामुळे गुन्हे शाखेतील संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांना आयुक्तालयातील बडे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश पोलीस वर्तुळात जात आहे. संभाव्य बेअब्रु टाळण्यासाठीच चौकशीचा ‘फार्स’ सुरू असल्याची टीका आता सुरू झाली आहे. -तर अधिवेशनात गाजणार ! वाशीम जिल्ह्यातून ११ नोव्हेंबरला पळविलेला १० चाकी ट्रक तोडण्यासाठी अमरावतीमधील नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला देण्यात आली. या ट्रकच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे एक पथक नागपुरी गेट हद्दीत असताना दुसऱ्या एका पथकाला हा ट्रक आढळला. हा ट्रक न पकडता या पथकाने त्या ट्रकला परतवाडाकडे रवाना केल्याचा आरोप आहे. वाशीम पोलीस यासंदर्भात अमरावती शहर पोलिसांशी वारंवार संपर्क साधत असल्याच्या पार्श्वभूमिवर गुन्हे शाखेतील संबंधित पथकावर आरोप झाल्याने या ‘टीप’ प्रकरणाची चौकशी आयुक्तांनी स्वत:कडे घेतली. गेल्या तीन आठवड्यात आयुक्तांनी यासंदर्भात गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. संबंधित व्यक्तींचे बयाणही नोंदविले. या ‘गोपाळ’ काल्याला जबाबदार कोण? हे ठरविण्याइतपत आयुक्त अंतिम निवाड्यापर्यंत पोहोचले आहेत. वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे कारवाई होईल. ती मोठीच असेल असे संकेत पोलीस आयुक्तांनी वारंवार दिले आहेत. यावरुन ‘टीप’ प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाणीमध्ये कुणाचे हात ओले झालेत, हे आयुक्तांना निश्चितपणे समजले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखेचा ‘डामडौल’ बिघडला आहे. ‘टीप’ प्रकरणात अधिकारी दर्जाच्या पोलिसांची नावे समोर येत असल्याने व त्या आधारावर कारवाई केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर अमरावती शहर पोलिसांची बेअबु्र होईल. स्थानिक लोकप्रतिनिधीही हा मुद्दा अधिवेशनात गाजवू शकतात, अशी भीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सतावत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. याशिवाय चोरी गेलेल्या ट्रकची माहिती दिल्यानंतरही ‘टीप’ देऊन तो ट्रक पुढे पाठवून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपात वाशिम पोलीस गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करू शकतात, अशी भीती असल्याने अधिवेशन काळात इभ्रत जाऊ नये, म्हणून चौकशीची गुऱ्हाळे सुरू असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)टीप’ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अंतिम निवाड्यापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाही. - राजकुमार व्हटकर,पोलीस आयुक्त, अमरावती.