शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 26, 2015 00:42 IST

जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे.

अमरावती : जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीननंतर सर्वाधिक १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक आहेत. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील कपाशीची पाने लाल होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणपणे बीटीची लागवड सुरू झाल्यापासून लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला पक्व झालेले पाने लाल झालेले दिसून येते. नंतर संपूर्ण पाने लाल होतात व पूर्ण कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. यामुळे उत्पादनात १० ते ६० टक्क्यांपर्यंत घट आल्याची उदाहरणे आहेत. लक्षणे ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे. बी.टी. कपाशी वाण भरपूर उत्पन्न देणारे असल्यामुळे झाडाला सर्वाधिक पात्या, फुले व बोंडे लागतात. त्यांच्या पोषणासाठी जर जमिनीत मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी असल्यास किंवा नत्र स्फुरद व पालाश ही खते समप्रमाणात व शिफारसीत दिलेली नसल्यास पाने लाल होतात. कपाशीमध्ये कायिक वाढीच्या काळात नत्राची कमतरता झाल्यास नत्राच्या कमी वहनामुळे प्रथिनांचे प्रमाण घटून पेशी द्रव्यांचा सामू कमी होऊन ‘टॅनीनची’ मात्रा वाढल्यामुळे पाने लाल होतात. जमीन सतत ओली असल्यास पोटॅशसुध्दा कमी प्रमाणात स्थिर होतो. लाल्यामुळे कॅलशियम, मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांच्या शोषण क्षमतेवरही विपरीत परिणाम झाल्याचे व सुदृढ झाडाच्या पानांच्या तुलनेत लाल पानांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश कमी झाल्याचे आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)