शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मात्र, पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : २१ गर्भवती पॉझिटिव्ह, १५ महिलांची प्रसूती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात संक्रमित गरोदर महिलांवर उपचार करणे कठीण होत आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातच महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी येथे दिली.कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मात्र, पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होते. त्यामुळे आता महिलांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयात आॅक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिकांचा समावेश असणार आहे. ७० ते ८० बेडचे हे रुग्णालय असेल. हल्ली कोरोना संक्रमित गरोदर मातांना डफरीन, कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत २१ गरोदर मातांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी १५ प्रसूती झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह महिला व नवजातांना जपणे आवश्यक असल्याने प्रशासनाने यासाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची पुष्टी जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली.१८० पेक्षा जास्त होम आयसोलेटेडअमरावती शहरात १८० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण होम आयसोलेटेड आहेत. मोझरी, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर येथे संक्रमित आढळून येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना अमरावतीत उपचारासाठी आणले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली. चांदूर रेल्वे, अमरावतीत प्राईम पार्क व एक अशी तीन रुग्णालये तयार होत आहेत. येथे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली.सारीचे तीन वॉर्डइर्विन रुग्णालयात सारी रुग्णांच्या उपचारासाठी ९, १० व ११ असे तीन स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. येथे आॅक्सिजन, व्हेंटिलेटर व अन्य सुविधा आहेत. हल्ली इर्विनमध्ये सॉरीचे २६, तर पीडीएमसीत १३ रुग्ण आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या