शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

‘नवसंजीवनी’मुळे राज्यातील दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:42 PM

राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्दे१०४ प्रकल्पांचा समावेश, ६,५११ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. याद्वारे एक लाख ४६ हजार ३५ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. योजनेतील ८१ प्रकल्प विदर्भातील आहेत. यावर ६,५९१ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च होणार असल्याने सलग दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भाला या योजनेमुळे संजीवनीच मिळणार आहे.शेतकरी आत्महत्याप्रवण व सलग दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यात निधीअभावी अर्धवट रखडलेले प्रकल्प आता राज्य शासनाने बळीराजा नवसंजीवनी योजनेच्या कक्षात आणले आहे. यामध्ये राज्यातील ८३ लघु प्रकल्प, व २१ मुख्य व मध्यम अशा एकूण १०४ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी २५ टक्के निधी हा केंद्रीय सहाय्यता योजनेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. पर्यावरण व अन्य वैज्ञानिक मान्यता असलेल्या तसेच केंद्रीय जल आयोग व नीती आयोगाची मान्यताप्राप्त प्रकल्पांची रखडलेली कामे याद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने ३१ मे २०१६ मध्ये केंद्राला प्रस्ताव पाठविला होता, तो आता मार्गी लागला आहे.यामध्ये राज्यातील ८३ लघु व २१ मुख्य प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची किंमत १६,०२६ कोटींची आहे. प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी ७,११५.९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातील ६९ लघु, १२ मुख्य व मध्यम अशा एकूण ८१ प्रकल्पांची किंमत १३,६४६.७१ कोटींची आहे व उर्वरित कामांसाठी ६,५९१.७८ कोटींचा खर्च येणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातील ६६ लघु व ११ मुख्य व मध्यम प्रकल्पांची किंमत ५,७३४.५४ कोटींच्या घरात आहे. यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी २,८१३.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. २५ टक्क्यांना निधी आता केंद्र शासन उपलब्ध करून देणार असल्याने प्रकल्पांच्या रखडललेल्या कामांना गती येऊन राज्यात किमान दीड लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.विदर्भात एक लाख हेक्टर सिंचन क्षेत्रवाढबळीराजा नवसंजीवनी योजनेमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत १,०६,३२९ हेक्टर सिंचनक्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२,४३० हेक्टर, अकोला २९,६२५ हेक्टर, वाशिम ११,०७५ हेक्टर, यवतमाळ १३,६५९ हेक्टर, बुलडाणा ५,४२४ हेक्टर व वर्धा जिल्ह्यात ४,१३० हेक्टरचा समावेश असून ४४४.६८ मीटर प्रकल्प साठ्यात वाढ होणार आहे.मराठवाड्यात ४० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रवाढया प्रकल्पामुळे मराठवाड्यात ३९,७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १६,९६६ हेक्टर, जालना ४,२८५ हेक्टर, परभणी २१०० हेक्टर, नांदेड ७,७७८ हेक्टर, लातूर ६,३५० हेक्टर, उस्मानाबाद १,७८५ हेक्टर, व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टरवाढ प्रस्तावित आहे, तर प्रकल्प साठ्यात १८९.८५ मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती