दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:12 IST2021-05-07T04:12:58+5:302021-05-07T04:12:58+5:30

फोटो पी ०६ दयार्पूर दर्यापूर : दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या २० वरून ५० पर्यंत न्यावी, त्याचप्रमाणे, ...

Increase the bed at Daryapur Kovid Care Center | दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवा

दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवा

फोटो पी ०६ दयार्पूर

दर्यापूर : दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या २० वरून ५० पर्यंत न्यावी, त्याचप्रमाणे, त्यात किमान १० ऑक्सिजन बेडची व्यवस्था असावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी नवाल यांनी बुधवारी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे भेट देऊन तेथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार बळवंतराव वानखडे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्यासह तहसीलदार, आरोग्य अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने दर्यापूर ग्रामीण रुग्णालयासह अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रुग्णालयांना भेट देऊन जिल्हाधिकारी नवाल यांनी स्थितीचा आढावा घेतला.

आवश्यक त्या सर्व ठिकाणी खाटांची संख्या, विशेषतः ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. आवश्यक साधनसामग्री मिळवून देण्यात येईल. लसीकरण केंद्रावर सुसज्ज व्यवस्था ठेवावी. गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टम राबवावी आदी निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिले. रुग्णालयाला आवश्यक औषधे व साधनसामग्री यावेळी उपलब्ध करून देण्यात आली.

Web Title: Increase the bed at Daryapur Kovid Care Center