शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

उत्पन्नस्त्रोताची चाचपणी

By admin | Updated: September 14, 2016 00:16 IST

तिजोरीत ठणठणाट असलेल्या महापालिकेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न स्थायी समितीने सुरू केला आहे.

प्रशासनाला सूचना : वाढीव उत्पन्नासाठी स्थायीचा पुढाकारअमरावती : तिजोरीत ठणठणाट असलेल्या महापालिकेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न स्थायी समितीने सुरू केला आहे. कामकाजात गती आणण्यासाठी दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी स्थायीने पुढाकार घेतल्याचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी सांगितले. टीडीआर हा नवा स्त्रोत महापालिकेला लाभदायी ठरणार असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी कॉम्प्लेशन सर्टिफिकेट नसलेल्या इमारती,वसाहती, व्यावसायिक संकुले व गाळ्यांना दंड आकारणीचे निर्देश ‘स्थायी’ने दिले आहे. अशा आकारणीसह वसुलीबाबत प्रयत्न न करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मार्डीकरांनी दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकांद्वारे घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पुरेशा प्रभावीपणे होते की नाही, याबाबत सर्वंकष आढावा घेतला जाणाार आहे. बहुतांश बांधकामधारक कॉम्प्लेशन सर्टीफिकेट घेत नसल्याने अशांवर दंड आकारला जाणार आहे. कधी नव्हे ते बाजार परवाना, एडीटीपी आणि मालमत्ता कर वसुली समाधानकारक होत आहे. तो वेग वाढविण्याच्या संदर्भातील सूचना स्थायीने यंत्रणेला दिल् या आहेत. मालमत्ता कर वाढविण्यासंदर्भात तूर्तास विचार केला नसला तरी वसुलीचा लक्ष्यांक वाढविल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडल्या आहेत. तेथे मल्टिप्लेक्स उभारलास उत्पन्नात घसघशीत वाढ अपेक्षित आहे. याशिवाय महापालिकेच्या गाळ्यांमधून मोठे उत्पन्न मिळविण्याची कसरत सुरू करण्यात आली आहे. याशिवाय टाऊन हॉलचे नूतनीकरण व परिसरात बांधकाम प्रकल्प उभारल्यास स्त्रोत वाढेल, त्यादृष्टीतही स्थायीने प्रयत्न चालविले आहे. टीडीआरमधून पालिकेच्या उत्पन्नात भर पाडण्यासाठीही काय करता येणे शक्य आहे, याची चाचपणी सुरू करण्यात झाली आहे. मालमत्ता कर आणि विकास शुल्क वगळता महापालिकेकडे उत्पन्नाचे स्त्रोत फारसे मजबूत स्थितीत नाहीत. याखेरीज महापालिकेवर २८१ कोटींचे दायित्व आहे. त्याअनुषंगाने सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर अमरावती महापालिकेकडे असलेले पाणीपुरवठ्याचे ४० कोटी रुपये माफ झाल्यास कर्जाचा बोजा कमी होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेचे हक्काचे ६० कोटी शासनाकडे थकीत आहे. तो निधी मिळाल्यास आर्थिक हातभार लागेल त्यासाठी स्थायीने पत्रव्यवहार चालविला आहे. (प्रतिनिधी)छत्रीतलाव सौंदर्यीकरण बीओटी तत्वावर व्हावेछत्री तलावाच सौंदर्यीकरणासाठी १०० कोटींच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली असली तरी तो प्रकल्प बीओटी तत्त्वावर साकारावा, यासाठी स्थायी सभापती आग्रही आहेत. निधीअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. १०० कोटींच्या छत्रीतलाव सौंदर्यीकरणासाठी केवळ १२.३५ कोटी रुपये मंजूर आहेत. हा निधी संपल्यावर काय? त्यामुळे हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर साकारावा आणि मंजूर झालेला निधी घनकचरा व्यवस्थापनासाठी द्यावा, असे मत त्यांनी मांडले.