शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या कामातील गौणखनिजाची अवैध विक्री

By admin | Updated: April 10, 2017 00:24 IST

तालुक्यातील धनोडीलगत वनउद्यानानजीक वर्धा डायव्हर्शन कॅनालचे खोदकाम सुरू आहे. यातून निघणारा हजारो ब्रास मुरूम विनापरवानगी विकला जात आहे.

मुरूम चोरी प्रकरण : नोटीस बजावूनही कारवाई थंडबस्त्यात वरूड : तालुक्यातील धनोडीलगत वनउद्यानानजीक वर्धा डायव्हर्शन कॅनालचे खोदकाम सुरू आहे. यातून निघणारा हजारो ब्रास मुरूम विनापरवानगी विकला जात आहे. यासोबतच परवाना नसताना चोरीच्या मार्गाने याची वाहतूक केली जात आहे. मुरुमाची तस्करी करताना महसूल अधिकारी किंवा फिरते पथकाला सुगावा लागू नव्हे, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी विविध ठिकाणी रोंजदारीची मानसे ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गौनखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क स्थापित केले असून याला पोलीस व महसूल विभागातील काही लोकांची साथ मिळत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे. अवैधरीत्या होणारी गौनखनीजाची वाहतुकीची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर अधिकृत कार्यवाही न करता हजार-दोन हजार रुपयांत ट्रक-टॅ्रक्टरला सोडून देण्यात येते. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) आदेशानंतरही दुर्लक्षरेल्वेच्या कामासाठी चोरीचा मुरूम वापरण्यात येत असल्याची माहिती उघड झाल्यावर याप्रकरणी तहसीलदार आशिष बिजवल यांनी संबंधिताना नोटीस बजावल्या होत्या. मात्र यासंदर्भातील अहवाल अद्याप सादर करण्यात आला नसल्याची माहिती आहे. तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिरीमिरीचा व्यवहार फोफावतोयचार दिवसांपूर्वी तालुक्यातील पुसला मार्गावर मध्यप्रदेशातून रेतीची वाहतूक करणारे चार रेतीचे ओव्हरलोड ट्रक महसूल विभागाच्या तलाठ्यांनी पकडले. परंतु, चिरीमिरी करून त्यांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कुणाचे नियंत्रण आहे, असाही प्रश्न केला जात आहे.