शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

By admin | Updated: April 3, 2017 00:21 IST

दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, ....

हरित लवादाचा निर्णय : वनविभागाकडून नियमांना छेदअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. परंतु वनविभागाने अद्यापही हरित लवादाच्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे वास्तव आहे.वर्धमान कौशिक आणि संजय कुलक्षेत्र यांनी युनियन आॅफ इंडिया व इतर यांच्याविरुद्ध दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलेल्या याचिका क्र. २४ /२०१४ नुसार मे २०१५ मध्ये दिलेल्या निकालानुसार झाडांचा पालापाचोळा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच जंगल शेजारी असलेल्या विटभट्टी, शेतातील काडीकचरा, फॅक्टरी आदींवर आगीसंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील २९ महापालिका, ३५३ नगरपरिषद, नगरपालिकांना तसेच ४४ हजार गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. झाडांचा पालापाचोळा जाळल्यानंतर होणारे नुकसान हे गंभीर असल्याचे राष्ट्रीत हरित लवादाने निकालात म्हटले आहे. जंगलशेजारील शेतात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक होते. हे गवत जळताना त्यासोबत किटक नाशक, तृणभक्षी पक्षी नामशेष होतात. परिणामी किटक नाशक, तृणभक्षी पक्षांवर अवलंबून असलेले वनप्राण्यांची संख्या आगीमुळे रोडावते. जंगलशेजारील शेतात पालापाचोळा जाळताना आगीच्या चिंगारीने हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे उदाहरण यापूर्वी घडले आहे. तर काही भागात जंगलाना काठेवाडी आणि धनगरांनी गुरांच्या चाऱ्यासाठी आग लावण्याचे प्रकार देखील घडवून आणले आहेत. त्यामुळे दरवर्षी वनविभाग आगीपासून जंगलाचा बचाव करण्यासाठी जाळरेषा तयार करते. यात महसूल विभाग ६ मीटर, तालुकास्तरावर १२ मीटर तर घनदाट जंगलात ४० मिटरची जाळरेषा तयार करुन जंगलांना आगीपासून वाचविले जाते. जंगलांना आगीपासून बचाव करण्यासाठी १९८२ पासून नियम अस्तित्वात आले आहे. मात्र जंगलांना आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना वनविभागाने कारवाई केली नाही, अशी माहिती आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर निर्णय देताना झाडांचा पालापाचोळा जाळण्याबाबत निर्बंध लादण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार, न्या. यू. डी. साल्वी, डी. के. अग्रवाल, ए.के. युसूफ, बी.एस. सजवन या सदस्यांनी झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळणे धोकादायकमहानगरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळून टेकडी कमी करण्याची शक्कल लढविली जाते. मात्र कचरा जाळताना निघणारा हा धूर अनेक आजार नागरिकांना देऊन जातो, असे राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकांनी डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळू नये. तसे आढळल्यास वनविभागाने कारवाई करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.वनांचे क्षेत्र घटण्याचे कारणवनजमिनींचे वाटप, वनसंवर्धन कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटप, महसूल विभागाकडे वनजमिन ताब्यात, वनहक्क कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटच, सामुहिक दाव्याप्रमाणे वनजमिनीचे वाटप, वनजमिनीवर अतिक्रमण.