शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
2
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
3
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
4
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
5
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
6
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
7
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
8
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
9
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
11
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
12
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
13
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
14
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
15
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
16
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
17
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
18
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
19
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
20
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
Daily Top 2Weekly Top 5

'या' कंपनीचे ईव्ही घ्याल तर वाहन जाईल भंगारात ; सव्हिंसिंग सेन्टरचा झाला बट्ट्याबोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:31 IST

Amravati : वाहनधारक त्रस्त, तक्रार करायची कोणाकडे?, शेकडो वाहने भंगारात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इंधन महागडे असल्यामुळे नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना पसंती देत ही वाहने खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र ओला कंपनीच्या वाहनांना वर्ष, दोन वर्षात या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड आला असून ऑनलाइन सर्व्हिसिंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. सर्व्हिसिंग केंद्राच्या परिसरात ओलाची शेकडो वाहने भंगारात पडून असून दुरुस्ती होण्याचा पत्ता नाही. या केंद्रावरून वाहनधारकांना योग्य उत्तर मिळत नाही. लाख, दीड लाखांचे हे वाहन खरेदी करूनसुद्धा दुरुस्तीसाठी येरझारा माराव्या लागत आहेत.

ओला ईव्ही वाहनाची मार्केटिंग करताना कंपनीने मोठमोठे आमिष दाखविले होते. 'सब कुछ ऑनलाइन' असे म्हणत ग्राहकांना भुरळ पाडली. हे इलेक्ट्रिक वाहन हे बाहेरून देखणे आणि वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असल्याने अनेकांनी ते ऑनलाइन खरेदी केल्यात. मात्र वर्ष, दीड वर्षातच अनेकांना ओला ईव्ही वाहनांचे वास्तव जाणवू लागले आहे. चार्जर कनेक्शन पॉइंटमध्ये दोष असल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. २ ते ६ महिन्यांपासून अनेक वाहने ही सर्व्हिसिंग केंद्राच्या बाहेरच बेवारस पडून आहे. ही वाहने दुरुस्त करणारे मॅकेनिकल बाजारात उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना कंपनीच्या सर्व्हिसिंग केंद्राशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. अशी स्थिती राज्यभरात असून, ओला वाहनांची समस्या सोडविणे ही काळाची गरज ठरू लागली आहे. 

सव्हिंसिंग सेंटरही अडगळीच्या ठिकाणी

ओला ईव्ही वाहने म्हणजे नाव मोठे दर्शन खोटे असाच काहीसा कारभार सुरू आहे. या वाहनात बिघाड आल्यास ते सर्व्हिसिंग सेंटरसुद्धा अडगळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ओला वाहन नादुरुस्त झाल्यास इतर वाहनात टाकूनच सर्व्हिसिंग सेंटरला आणावे लागते. गोपाल नगर ते सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावर एका भाड्याचा घरात हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करून हे सेंटर गाठावे लागते. गत १५ दिवसांपासून सव्हिसिंग सेंटर बंद होते. आता २० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. या संदर्भात अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

शासन, प्रशासन लक्ष देईल का?

ओला वाहनात नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहेत. याबाबत वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी शासन, प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

"आम्ही तीन वर्षांपूर्वी ओला वाहन खरेदी केले. वर्षभरात वाहनात बिघाड आला. बॅटरीदेखील डाऊन झाली. ३ महिने सेंटरमध्ये ही गाडी ठेवण्यात आली. त्यानंतर ती दुरुस्त झाली."- माया बांबोडे, अमरावती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ola EV Purchase: Vehicle May End Up Scrap; Service Center Failure

Web Summary : Ola EV owners in Amravati face major issues. Vehicles malfunction within two years, online servicing is failing. Hundreds of vehicles are abandoned at service centers, with repairs uncertain, causing frustration for owners.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरOlaओलाAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर