शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक पुरस्कार अद्यापही लॉकडाऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. परंतु सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक ...

अमरावती : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. परंतु सन २०१९-२० चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही अजूनपर्यंत लॉकडाऊनच आहेत. सदर पुरस्कार वितरणाचा मुहूर्त काढण्यात न आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांना शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जातात. मात्र, काही वर्षांपासून विविध कारणांमुळे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण वेळेत होत नसल्याचे वास्तव आहे. अशातच सन २०१९-२० या वर्षांतील आदर्श शिक्षक पुरस्कारपाप्त शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांनी ११ जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षण विभागाने सादर केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादीही जाहीर केली आहे. यात १४ प्राथमिक आणि १ माध्यमिक अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झालेला आहे. परंतु जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झेडपीकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षक समितीने आदर्श शिक्षक पुरस्कार हे २६ जानेवारी रोजी वितरित करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य होऊन पुरस्कार जाहीर झाले तेव्हापासून वितरणाचा मुहूर्त निघाला नाही. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार अद्यापही लॉकडाऊनच आहेत.

बॉक्स

१० मार्चला वितरणाची मागणी

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप वितरित केलेले नाहीत. अशातच सध्या कारोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतच्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करून येत्या १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून पुरस्काराचे वितरण करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.