'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:03 IST2025-09-21T15:01:20+5:302025-09-21T15:03:43+5:30

Amravati Crime News: पतीपासून वेगळं राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिला. पण, लग्नाचा विषय आला आणि त्याने नकार दिला. 

'I don't want to live with you anymore'; 28-year-old woman living separately from her husband raped multiple times | 'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार

'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार

Amravati Latest News : पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका २८ वर्षीय महिलेवर २०२१ ते २०२५ या काळात अनेकवेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक बळजबरी करण्यात आली. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. २७ नोव्हेंबर २०२१ ते १४ सप्टेंबर २०२५ या दरम्यान ती लैंगिक अत्याचाराची घटना घडली. 

याप्रकारे चांदूर रेल्वे पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सौरभविश्वासराव शिंगाडे (२६) व योगेश विश्वासराव शिंगाडे (२८, दोघेही रा. सुलतानपूर, ता. नांदगाव खंडेश्वर) यांच्याविरुद्ध बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, प्रकरणाची सुरवात कशी झाली?

बलात्काराचा आरोप असलेल्या सौरभ शिंगाडे याला १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. एफआयआरनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये फिर्यादी महिलेची सौरभ शिंगाडे याचे सोबत ओळख झाली व पुढे त्यांच्या प्रेमसंबंधदेखील जुळले. 

दरम्यान फिर्यादी ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असल्याने सौरभ याने तिला लग्नाचे आश्वासन दिले. तथा तिचेशी वारंवार शारीरिक बळजबरीदेखील केली. विशेष म्हणजे ते 'लिव इन रिलेशनशिप'मध्ये सोबतदेखील राहत होते.

सौरभ काहीही न सांगता निघून गेला

दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी आरोपी सौरभ हा पीडितेला काहीही न सांगता निघून गेला. त्यामुळे पीडिताने भावासह आरोपी सौरभचे सुलतानपूर येथील घर गाठले. त्यावेळी तिथे सौरभ व योगेश या दोघांनी तिच्याशी वाद घातला. 

आपण चांदुर रेल्वे येथे जाऊन बोलू असे त्याने बजावले. चांदूर रेल्वे येथे परतल्यानंतर त्याने आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, लग्नदेखील करायचे नाही, असे बजावले. त्यावर फिर्यादीने त्याला लग्न न करण्याचे कारण विचारले. याचवेळी सौरभने तिला शिवीगाळ केली तर योगेश याने तिच्या गालावर थापड मारली.

Web Title: 'I don't want to live with you anymore'; 28-year-old woman living separately from her husband raped multiple times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.