ढाणकी नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती; भाजपाचा नगराध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 13:59 IST2019-12-30T13:58:24+5:302019-12-30T13:59:25+5:30
ढाणकी येथील नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला.

ढाणकी नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती; भाजपाचा नगराध्यक्ष
यवतमाळ: ढाणकी येथील नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला. मात्र नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार अटीतटीच्या लढतीत विजयी झाले.
ढाणकी नगर पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे सुरेश जयस्वाल यांनी ६५३ मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले. १७ सदस्यीय नगर पंचायतीत मात्र काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला.
१७ पैकी सहा जागांवर काँग्रेस, चार जागांवर भाजप, प्रत्येकी दोन जागांवर शिवसेना व वंचित आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीचा उमेदवार एका प्रभागातून विजयी झाला. मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत बहाल केले नाही. सोमवारी ढाणकी येथील शासकीय गोदामात मतमोजणी झाली. निकालानंतर भाजप व काँग्रेसच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.