पोलीस सुस्त कसे? : सामाजिक दबाव झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:01 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:01:04+5:30

५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस्थाची भूमिका घेतली.

How dull the police? : Social pressure eased | पोलीस सुस्त कसे? : सामाजिक दबाव झुगारला

पोलीस सुस्त कसे? : सामाजिक दबाव झुगारला

ठळक मुद्देबयाण १० जणांचे; मृत्यूचे कारण कळेना

दर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूला आठ दिवस उलटत असताना स्थानिक पोलीस अंधारात चाचपडत आहेत. गोदावरी हॉस्पिटलमधील सीसीटिव्ही फुटेज, दहा जणांचे बयाण आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतरही डॉ. भट्टड यांची आत्महत्या की घातपात? यापैकी कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचू शकली नाही. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे सोपवावा, अशी आग्रही मागणी होत असतानाही स्थानिक पोलीस त्यांच्या मृत्यूची गूढ उकलण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.
५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस्थाची भूमिका घेतली. मात्र, सामाजिक व राजकीय दबाव आल्याने पोलिसांनी शवविच्छेदनासाठी होकार मिळविला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्याला वैद्यकीय अहवालाची जोड देण्यात आली. मात्र, आठवड्यानंतरही डॉ. भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा थांबलेली नाही. हजारोंचे प्राण वाचविणारे डॉक्टर आत्महत्या करूच शकत नाही, असा विश्वास दर्यापूरकरांना आहे. त्यामुळे आता तर घातपाताची शक्यता बोलून दाखविली जात आहे. मात्र, पोलीस आत्महत्येवरच थांबली असून योग्य दिशेने कुठलाही तपास करण्यात आलेला नाही. अनेक मुद्दे घातपाताच्या शंकेला खतपाणी घालणारे असताना स्थानिक पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा आत्महत्येपुरती मर्यादित केली आहे. हे संपूर्ण प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादित राहावे, यासाठी अनेकांचे खिसे गरम करण्यात आल्याची चर्चा आहे. असे असताना पोलीस इतर आकस्मिक मृत्यूप्रकरणासमान या हायप्रोफाईल प्रकरणाला ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. हाती आलेले फुटेज, त्यातील वास्तव पाहता याचा तपास घातपाताचा दिशेने व्हावा, अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान व्हिसेरा अहवाल केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डॉक्टरांवर ताण कशाचा?
डॉ. भट्टड यांनी आत्महत्या केली असेल, असा पोलिसांना दावा खरा मानल्यास त्यांनी आत्महत्या का केली असावी, याबाबत पोलीस साधा प्राथमिक निष्कर्षही काढू शकले नाहीत. केवळ सामाजिक बदनामी होऊ नये, यासाठी आपण हृद्याघाताचा बनाव केला, या डॉक्टरपत्नीच्या बयानावर विश्वास ठेऊन पोलिसांनी घातपाताची शक्यताच पुर्णपणे नाकारली आहे.

Web Title: How dull the police? : Social pressure eased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.