शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत नऊ कोटींच्या गुटख्यांची होळी

By admin | Updated: August 9, 2015 23:53 IST

महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते.

८८ जणांवर कारवाई:१०३ प्रकरणे न्यायालयातअमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून तब्बल नऊ कोटींचा गुटखा जप्त करून नष्ट केला आहे. महाराष्ट्र शासनाने २०१२ पासून मनुष्यांच्या आरोग्यास घातक असलेल्या तंबाखू, तंबाखूजन्य व सुपारी युक्त उत्पादनावर बंद घातली आहे. बंदी लागू झाल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात गुटख्यांची विक्री होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून गुटखा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात विक्री होत असल्याचे लक्षात येत आहे. मध्यंतरी नागपूर व औरंगाबाद येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अमरावती शहरात कारवाईचे धाडसत्र सुरू केले होते. मागील तीन वर्षांची आकडेवारीवर लक्ष दिल्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाने २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ पर्यंत जिल्ह्यातील ११७ ठिकाणी धाडी टाकून गुटख्यांच्या मालाची तपासणी केली आहे. त्यामध्ये ५३ ठिकाणावरून ५ कोटी ७ लाख ९९ हजार ४८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. यामध्ये ११ व्यवसायिकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली असून या वर्षात ५३ प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आले. त्याच प्रमाणे २०१३-१४ मध्ये २५३ ठिकाणी छापे टाकून ५० जणांकडून २ कोटी २ लाख ४ हजार ६३० रुपयांच्या गुटख्याचा माल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ४८ जणांविरूध्द फौजदारी तर ५० प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्यात आले. २०१४-१५ मध्ये आतापर्यंत ४८ ठिकाणी धाडी टाकून २९ जणांकडून १ कोटी ५ लाख २६ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला तर २६ जणांविरुध्द फौजदारीची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)