शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान बंद झाल्याने वनौषधी उत्पादक बेजार

By admin | Updated: March 28, 2017 00:05 IST

वनौषधीयुक्त वनस्पती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.

आंदोलनाचा इशारा : आयुष मंडळाकडून शेतकऱ्यांची दिशाभूलअंजनगाव सुर्जी : वनौषधीयुक्त वनस्पती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, या पिकाला येणारा खर्च मोठा असल्याने व आयुष मंडळाच्या वतीने देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. सुरुवातीला या पिकाला कोणतीही रोगराई नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडणारे होते. परंतु गेली ५ ते ६ वर्षापासून या वनौषधी पिकांवर निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे रोगराई येत असून त्यामध्ये वनौषधी पिकवणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.या खर्चीक असलेल्या पिकांना केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान व ४० टक्के वाटा हा महाराष्ट्र शासनाच्या आयुष मंडळ पुणे यांच्याकडून दरवर्षी मिळत होते. त्यासाठी आयुष मंडळ पुणे यांचेकडून महाराष्ट्रातील एकूण वनौषधी पिकांचा कृती आराखडा अ‍ॅक्शन प्लॅन दरवर्षी सादर करावा लागत असतो. परंतु यावर्षी मागील महिन्यामध्ये दिल्ली येथे आयुष मंडळाच्या झालेल्या बैठकीदरम्यान पुणे औषधी मंडळाच्यावतीने कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील औषधी वनस्पतीवरील अनुदान व एकूण लागवड व त्यावरील उपाययोजनांबाबत कोणताही कृती आराखडा सादर केला नाही. त्यामुळे यावर्षी सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्रातील सर्व वनौषधी पीक उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. परिणामी वनौषधी उत्पादक शेतकरी पूर्णपणे अनुदानापासून वंचित राहणार आहेत. याबाबत माहिती मिळताच अंजनगावचे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे यांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर, प्रवीण पोटे, आ. रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली. (शहर प्रतिनिधी)सुपीक शेतीत लागवडसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषत: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, अकोट, जळगाव जामोद, चिखलदरा, अचलपूर या भागातील सुपीक असलेल्या शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वनौषधी पिकाची लागवड केली जाते.