शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

धारणीत दुकानांना भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क धारणी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अमरावती ते बºहाणपूर मुख्य मार्गावर कुसुमकोट खुर्द फाट्यावरील दोन ...

ठळक मुद्देदोन दुकाने जळून खाक : २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अमरावती ते बºहाणपूर मुख्य मार्गावर कुसुमकोट खुर्द फाट्यावरील दोन दुकानांना बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक धावून गेले. मात्र, पाहता पाहता ही दुकाने जळून खाक झाली .पोलीस सूत्रांनुसार, कुसुमकोट खुर्द फाट्यावर भीमराव नागले यांचे कुशन वर्क, स्पेअर पार्ट आणि रेडियमचे दुकान आहे. बुधवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून भीमराव घरी आले. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना दुकानाला आग लागल्याचे फोनवरून एकाने कळविले. घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यांच्या दुकानात जवळपास २० लाख रुपये किमतीचे साहित्य होते. याच दुकानाला लागून असलेल्या शैलेश युवराज शिटोले (रा. शिरपूर) यांच्या मोटरसायकल गॅरेजलासुद्धा आगीने कवेत घेतले. यामध्ये शैलेश शिटोले यांचे जवळपास ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही आगग्रस्तांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तसेच धारणी पोलिसांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे .घातपाताची शक्यताधारणी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तथापि, आग लागली त्यावेळी पाऊस पूर्णपणे थांबला होता. अशा परिस्थितीत अचानक दुकानाला आग लागण्यामागे घातपाताची शंका दोन्ही दुकानदारांनी व्यक्त केली आहे. पाऊस सुरू असता, तर ते जबर नुकसानापासून बाचले असते. घटनास्थळी उपस्थित अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीच्या भीषणतेमुळे कोणी काही करू शकले नाही.फायर ब्रिगेडची मागणीधारणी तालुक्यात १७० गावे आहेत. तालुका मुख्यालयी अग्निशमन वाहन नसल्यामुळे वारंवार लागणाऱ्या आगी नियंत्रणासाठी शंभर किलोमीटरवरील अचलपूर , बराणपुर आणि खंडवा येथून फायर ब्रिगेडची प्रतीक्षा करावी लागते. बुधवारच्या आगीनंतर फायर ब्रिगेडची मागणी पुन्हा पुढे आली आहे.नागलेंची महसूल पोलिसांकडे तक्रारभीमराव गणपत नागले यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. आपल्या दुकानातील स्पेअर पार्ट, कुशन, रेडियमचे बंडल, काही रोख असा २० लाख रूपयांचा ऐवज जळून खाक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुसुमकोट खुर्दकडे जाणाºया फाट्याजवळ आपण ते दुकान भाड्याने घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :fireआग