शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वसूलपात्र रकमेसाठी आॅगस्टच्या वेतनावर ‘टाच’

By admin | Updated: September 10, 2016 00:11 IST

सन २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालानंतर वेतन कपातीचे अस्त्र उगारण्यात आले आहे.

 कंत्राटदारांना नोटीस : लेखा परीक्षण अहवालाअंती कारवाईप्रदीप भाकरे अमरावतीसन २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालानंतर वेतन कपातीचे अस्त्र उगारण्यात आले आहे. कंत्राटदार, विभागप्रमुख व महापालिकेतील संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही सुमारे १२ कोटी रुपयांची रक्कम वसुल करावयाची आहे. सन १९९२ पासून विविध खातेप्रमुखांकडे लेखापरिक्षणातील वसुलीपात्र रकमा अद्याप वसुल झालेल्या नाहीत. याशिवाय वर्षनिहाय लेखा आक्षेप असलेल्या कंत्राटदार पुरवठादाराची वसुलीपात्र रकमेची यादी मोठी आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही लेखा परीक्षणातील आक्षेप वसुलीपात्र रकमा वसुल होणे बाकी आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटीस पाठावाव्यात आणि अशा सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचे माहे आॅगस्टपासून निव्वळ देय वेतन वसुलीपात्र रकमा जमा होईपर्यंत रोखून ठेवण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षकांना दिले आहेत. याशिवाय वसुलीपात्र रकमेची वसुली करुन त्याचा तपशिल दरमहा द्यावा, असे निर्देशही देण्यात आलेत. मासिक पेन्शनमधून कपातलेखापरीक्षण अहवालामध्ये अनेक बाबींवर आक्षेप घेतल्या जातो. अनियमिततेवर बोट ठेवून कोट्यवधीच्या रकमा अमान्य ठरविण्यात येतात. त्या रकमेची वसुली संबंधितांकडून करावी, असे निर्देशही असतात. त्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडे थकित असलेल्या वसुलीपात्र रकमेबाबत स्वतंत्र कार्यपद्धती अवलंबविली जाणार आहे. त्यासाठी स्वातंत्र नोटशिट तयार करावी, संबंधितांच्या मासिक पेन्शनमधून वसुल पात्र रक्कम किती समान टप्प्यात वसुल करता येईल, हे निश्चित करण्याच्या सूचना दिल्यात वसुलीसाठी स्वतंत्र लिपिक नेमाज्या कंत्राटदार पुरवठादारांवर लेखा आक्षेप आहेत, ते काम सोडून गेले असल्यास संबंधित झोनच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत वसुलीपात्र रकमेच्या वसुलीसाठी त्यांना मागणी बिले बजावावीत. तथा वसुली अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याची प्रणाली अवलंबवावी. वसुलपात्र रकमेची वसुलीकरण्यासाठी आवश्यकता असल्यास लेखापरीक्षण विभागात स्वतंत्र लिपिकाची नियुक्ती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.