शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागच घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसोबतच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी कोपऱ्यात शौचालयाची सोय शासनाने केली खरी, मात्र तेथील अस्वच्छतेमुळे त्या शौचालयाचा ...

जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसोबतच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी कोपऱ्यात शौचालयाची सोय शासनाने केली खरी, मात्र तेथील अस्वच्छतेमुळे त्या शौचालयाचा वापर होताना दिसत नाही. परिणामी डफरीनमध्ये येणारे रुग्णांचे नातेवाईक पहाटे हिवताप, फायलेरीया, कुष्ठरोग निर्मूलन विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच शौचास बसतात. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच प्रवेश करावा लागतो. यामुळे वराहांचादेखील वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, भीती वाटेल अशा अवाढव्य वाढलेले वराह या रस्त्याने फिरताना दिसतात. कर्मचाऱ्यांना सतत दुर्गंधीसह स्वाईन फ्लू आजाराच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावर उपाययोजना न केल्यास सामान्यांचा आजार पळविणारा आरोग्य विभागच आजारी पडल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.

बॉक्स

पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना मनस्ताप

हिवताप कार्यालयासमोरील त्या रस्त्यावर घाण होत असल्याने वराहांचा वावर वाढल्याचे वृत्त लोकमतने ३० नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोपऱ्यात शौचालयाचे नव्याने बांधकाम करून रुग्णांच्या नातेवाईकांची सोय केली होती. मात्र, त्या शौचालयाची दुरवस्था झाल्याने पाय ठेवणेही कठीण झाल्यामुळे लोक रस्त्यावरच प्रात:विधी आटोपताना दिसत आहे. परिणामी पुन्हा रस्त्यावर दुर्गंधी वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे.

कोट

मध्यंतरी घाण करणे बंद झाले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर शौच केली जात असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, फायलेरिया व आरोग्य प्रशिक्षणार्थींना नाकाला रुमाल लावावे लागत आहे. अक्षरश: उलटी होण्याची स्थिती निर्माण होत आहे. यावर उपाय होणे गरजेचे आहे.

- डॉ. वासनिक, सहायक संचालक, कुष्ठरोग

--

रुग्णांकरिता डफरीन रुग्णालयातही शौचालय आहेत. त्यानंतर नातेवाईकांसाठी बाहेरील भागातही सार्वजनिक शौचालयाची सुविधा केलेली आहे. तेथील स्वच्छतेची जबाबदारी स्वीपरकडे आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांचे नातेवाईक शौचालयाचा विनामूल्य वापर करण्याऐवजी रस्त्यावर जातात.

- डॉ. विद्या वाठोडकर, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय