अचलपूरच्या हिरापुऱ्यात दोन गटांत हाणामारी, चौघे गंभीर
By Admin | Updated: August 5, 2015 00:31 IST2015-08-05T00:31:56+5:302015-08-05T00:31:56+5:30
घराशेजारीच विवाह झालेल्या मुलीला सासरची मंडळी त्रास देत असल्याने झालेल्या वादाचे जोरदार हाणामारीत रूपांतर झाले.

अचलपूरच्या हिरापुऱ्यात दोन गटांत हाणामारी, चौघे गंभीर
विवाहितेचा छळ : आठ जण किरकोळ जखमी
अचलपूर : घराशेजारीच विवाह झालेल्या मुलीला सासरची मंडळी त्रास देत असल्याने झालेल्या वादाचे जोरदार हाणामारीत रूपांतर झाले. यात चार जण गंभीर जखमी झाले तर ८ जण किरकोळ जखमी झाले. या हाणामारीत लाठ्याकाठ्यासहीत शस्त्रांचा वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास डिरापुरा भागात घडली. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
हिरापुऱ्यातील अब्दुल माजीद शे. दाउद यांच्या मुलीचे घराशेजारी राहणारे शे. साबीर शे. घडू यांच्यासोबत ६ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहीत मुलीला ३ मुलांनंतर सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली. तिने त्रास असह्य झाल्याने पाच दिवसांपूर्वी गुरूवारी सासरच्या लोकांविरूद्ध अचलपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यात मो. साजीद मो. अकबर हा साक्षीदार होता.
मंगळवारी दुपारी मो. साजीद हा आपल्या घराजवळील चौकात उभा असताना मो. साबीर शे. घडू, शे. अय्युब शे. इस्माईल, अब्दुल मजीद शे. इस्माईल, शे. अजीज शे. इस्माईल, मो. मोसिन अब्दुल रहीम, मो. रासीम मो. रफीक, मो. रफिक शेख इस्माईल, शे. इस्माईल यांनी लाठ्याकाठ्या, पाईप हातात, गुप्त्या, फावडे घेऊन हल्ला चढविला.
या हाणामारीत अब्दुल रज्जाक शे. दाउद, अब्दुल कदीर शेख दाउद, अब्दुल मुनाफ शे. कासम, मो. जाहीद, अब्दुल मुनाफ, मो. आसीफ अब्दुल रज्जाक यांच्यासह आदींनी पूर्ण तयारीनिशी तेथे धाव घेतली. दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली.
याची माहिती अचलपूर पोलिसांना मिळताच अजय आखरे यांनी सहकारी स्वप्निल तवरसह तेथे तत्काळ पोहोचले.
दोन्ही गटांतील लोक हाताबाहेर जाताहेत हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलीस कुमक घटनास्थळी बोलाविली. पोलीस वेळीच पोहोचल्याने अनर्थ टळला. (शहर प्रतिनिधी)