शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शाळेसाठी ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ मस्ट !

By admin | Updated: July 19, 2016 00:07 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे.

निकषांची चतु:सूत्री : राज्यभरात स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजनाअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे. जिल्हास्तरावर ४८, राज्यस्तरावर ४० तर राष्ट्रीय पातळीवर एकूण शंभर शाळांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. आहारापूर्वी हात धुण्यासाठी शाळेत हॅन्डवॉश स्टेशन असणे आणि त्यातही सात पातळ्यांवर या हात धुण्याची प्रक्रिया, हा पुरस्कारासाठी प्रमुख निकष राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘हात धुवादिन’ ही संकल्पना राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. तथापि अनेक शाळांमध्ये केवळ औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली. पुरस्कार पटकाविण्यासाठी मात्र ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ असणे बंधनकारक आहे. शासकीय व अनुदानास पात्र शाळांनाच नामांकन नोंदवता येणार आहेत. आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक व क्षमता विकास या पाच विभागात एकूण ३५ घटकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत नामांकन पाठवायची असून एमएचआरडीच्या संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल नंबरवर मिसकॉल दिल्यास त्या शाळांना प्रश्नावली उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तीन समित्या स्थापन केल्या असून गुणांचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना विविध रंगनिहाय श्रेणी दिली जाणार आहे. ३५ पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या शाळांना लाल रंगाची तर ९० ते १०० गुण मिळवणाऱ्या शाळांना हिरव्या रंगाची श्रेणी असेल. ७५ ते ८९ गुण मिळणाऱ्या शाळांना निळ्या ५१ ते ७४ गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा तर ३५ ते ५० गुण मिळणाऱ्या शाळांना नारंगी रंगाची श्रेणी असेल. ग्रामीण भागातील ७० टक्के शाळा आणि शहरी भागातील ३० टक्के शाळांचा पुरस्कारासाठी विचार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्यस्तरावरील तर ७ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)हात धुवा कशासाठी ?जगभरातील लहान मुलांना हात धुण्याची सवय लागावी, हात धुणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा आणि त्यांनी स्वच्छता पाळून आजाराला प्रतिबंध घालावा, या उद्देशाने १५ आॅक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन (ग्लोबल हॅन्ड वॉशिंग डे) म्हणून साजरा होतो. जगात पहिल्यांदा १५ आॅक्टोबर २००८ ला हा दिवस साजरा झाला. विषाणू तसेच डायरियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे हा देखील या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.