शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरे अमरावती : ४ मार्चपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र दिल्यामुळे विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत.  विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी असल्याने कुठेच अडचण नसल्याचे केंद्रांवर दिसून येत आहे.पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत.मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

  ‘लोकमत’ने काय पाहिले? 

आमचेच विद्यार्थी असल्याने मदत : यंदा शाळेत परीक्षा होत आहेत. विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे त्यांना थोडीफार मदत करावी लागते; मुख्याध्यापकांकडून प्रत्यक्ष मदतीसाठी मनाई केलेली आहे, असे सांगितले. 

काय करावे? उत्तर सांगावे लागते : यंदा प्रथमच शाळेतील विद्यार्थी शाळेतच परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारले, तर त्याला मार्गदर्शन करण्यात गैर काय? विद्यार्थ्यांना उत्तर सांगावेच लागते, असे प्रत्युत्तर मिळाले.

अडचण आल्यास विद्यार्थीच विचारतात! : शाळेतच परीक्षा केंद्र. विद्यार्थीही आमचेच असल्यामुळे आमच्याकडून मदतीची अपेक्षा आहेच. परीक्षेत अडचण आल्यास, विद्यार्थ्याने उत्तर विचारल्यास, त्याला सांगावेच लागते. विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल व निकालाची टक्केवारी वाढत असेल, तर कोण मदत करणार नाही.

आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांवर कारवाई- ४ मार्चपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर शांततेत पार पडला. विभागात बारावीचे एकूण ३९७ केंद्र आहेत. त्यापैकी ग्रामीण व शहरी भागातील भरारी पथकांनी कारवाई करीत पहिल्याच दिवशी २६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भरारी पथक, रनर यांच्या माध्यमातूनही गैरप्रकार रोखण्यासाठी ‘वाॅच’ ठेवला जात आहे.- प्रफुल्ल कचवे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा