शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा उत्पादकांना हवा पॅकेजचा सरसकट लाभ

By admin | Updated: December 3, 2014 22:42 IST

सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा

सुनील देशपांडे - अचलपूर
सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांपर्यंतच्या पॅकेजचे वाटप सुरू झाले आहे. या पॅकेजमध्ये बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, औषधे व फवारणी पंपांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा अचलपूर तालुका आहे. जवळपास ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यांचे शेतातील पीकपाणी निसर्गाच्या भरवशावर आहे. ओलिताची शेती करणाऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत असल्याने त्यांनाही पीक घेणे कठीण होऊन बसले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दुबार, तिबार पेरणी करुनही बियाणे उगवले नाही. नापिकी, कमी उत्पादन आणि बेभरवशाची शेती, त्याचबरोबर बँका, पतसंस्थांचे कर्ज, ऋण काढून केलेली शेती त्यातच अवकाळी पाऊ स आणि अतिवृष्टीचा बसलेला फटका आदींमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आदी संकटामुळे शेतकरी होत्याचे नव्हते झाले आहे.
शासनाने कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा निवडकांसाठी जाहीर केली असल्याने बाकी हरभरा उत्पादकांत असंतोष निर्माण झाला आहे. सर्व्हे करुन सरसकट पॅकेजचा लाभ देण्यात यावा, अशी हरभरा उत्पादकांची मागणी आहे.
अचलपूर तालुक्याच्या ज्या भागात हरभऱ्याचा पेरा अधिक असतो अशा निवडक गावांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळे चार प्रकल्प राबविण्यात येत आहे.
एकंदरीत चार प्रकल्प मिळून ७५० शेतकऱ्यांना संपूर्ण तर २५० शेतकऱ्यांना बियाणेरहित प्रकल्पाचा लाभ देण्यात येणार आहे.
अचलपूर तालुक्यातील १०० हेक्टरवर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रति शेतकरी ४० आर. क्षेत्रासाठी हा लाभ दिला जाईल. यात या शेतकऱ्याला ४० आर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, पाठीवरील फवारणी पंप कीटकनाशके व मशागतीच्या खर्चासाठी रोख रक्कम दिली जाणार आहे. सर्वांचे मिळून साडेसात हजारांचे हे पॅकेज असेल, असे कृषी अधिकारी पी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.