शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसाळ्यातही मिळेना जनावरांना हिरवा चारा

By admin | Updated: August 5, 2014 23:14 IST

यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर उशीरा का होईना पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. मात्र भर पावसाळ्यातही डोंगराळ जमीनी ओसाड असल्याने शेतकऱ्यांचा पशुधन

जितेंद्र दखने - अमरावतीयंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर उशीरा का होईना पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. मात्र भर पावसाळ्यातही डोंगराळ जमीनी ओसाड असल्याने शेतकऱ्यांचा पशुधन जगविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. यंदा तर निम्यापेक्षा जास्त पावसाळ्याचा कालावधी निघून गेला तरी हिरवा चारा नाही. पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून महागडा चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने चारा छावण्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूर अशा विविध संकटाचा शेतकऱ्यांना सतत सामना करावा लागत आहे. पावसाळ्याची दोन महिने लोटली तरी डोंगरमाथ्यावरील हिरवळ दुरापास्त झाल्याने जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. तीन वर्षांपासून विविध संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही पावसाने हुलकावणी दिली. पावसाळ्यात मका, बाजरीचे सरमाड आणि ज्वारीची वाढ खुंटल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. पावसाळा सुरू होताच महिनाभरात डोंगरमाथे हिरवीगार होऊन जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होतो. मात्र यंदा पावसाअभावी श्रावण महिना उजाडला तरी हिरवळीअभावी डोगराळ भाग उजाड असल्याचे दिसून येते. त्यामुळे पशुधन कसे वाचवावे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे.