शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

प्रस्ताव आल्यास एमबीबीएसच्या वाढीव जागांना परवानगी - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 7:44 PM

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थारुपी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्ष झाले आहे. राज्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या.

अमरावती : पीडीएमसी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) घेणा-या विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता १०० ची असून, आता ती वाढवून १५० करावी, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केली. त्यावर तुम्ही मान्यतेसंदर्भाच्या सर्व त्रुटी, निकष, नियम पूर्ण करून आमच्याकडे प्रस्ताव पाठवा, त्याला आम्ही तत्काळ परवानगी देऊ, तसेच गोरगरिबांना वैैद्यकीय सेवा देण्यासाठी महाविद्यालयाला सर्वस्तरावर प्रयत्न करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते पीडीएमसीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थारुपी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्ष झाले आहे. राज्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला येणा-या अडचणी सोडविण्याठी मी कटिबद्ध आहे, असा उल्लेखही त्यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयाला दिलेल्या निधीतील जो निधी शिल्लक राहिला असेल, त्यासाठी आम्ही पाठपुरवा करू, असेही ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १२ कोटी अंदाजित रकमेचे आॅडिटोरीयम हॉल बांधण्याचे संस्थेने ठरविले आहे. या सभागृहाचे भूमिपूजन तसेच प्रसूतीशास्त्र आयसीयू विभाग व सिटी स्कॅन मशीनचे लोकार्पण शनिवारी ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पीडीएमचीच्या सभामंडपात कार्यक्र म पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, रामचंद्र शेळके, गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सचिव शेषराव खाडे, कार्यकारिणी सदस्य, माजी प्राचार्य केशवराव गावंडे, हेमंत काळमेघ, अशोक ठुसे, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो. ठाकरे, मीनाक्षी गावंडे, प्रमोद देशमुख पीडीएमसीचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन देशमुख व आमदार सुनील देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी, संचालन राजेश मिरगे यांनी, तर आभार सचिव शेषराव खाडे यांनी मानले. जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख राजेश उमाळे व त्यांच्या चमुने स्वागतगीत सादर केले. यावेळी सर्व आजीवन सदस्य, पीडीएमसीतील सर्व डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

विभागातील प्रकल्पांचा घेतला आढावा यवतमाळ जिल्हा वगळता विभागातील चार जिल्ह्यांतील प्रकल्पांचा आढावा शनिवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ना. गिरीश महाजन यांनी घेतला. यामध्ये सध्या धरणात असलेला पाणीसाठा, २०१९ पर्यंत पूर्ण कराव्याचे प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्प, पुनर्वसन, भूसंपादन, सुधारित प्रशासकीय मान्यता आदी विषयासंदर्भात अधिकाºयांकडून आढावा घेतला आहे. पर्यावरणाच्या मान्यतेअभावी जे दोन ते तीन प्रकल्प बंद आहेत, त्यांचा प्रश्न महिन्याभरात सुडवू, असेही ते म्हणाले. बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, विदर्भ सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, सर्व आमदार, चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन