शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

शासन उदासीन, साझांची संख्यावाढ रखडली

By admin | Updated: March 31, 2017 00:20 IST

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे.

तलाठ्यांवर ताण : लोकसंख्येच्या प्रमाणात ४० साझा वाढणार अमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्या वाढविण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात ४० साझा वाढणार आहेत. यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला. मात्र अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे गेल्या वर्षापासून प्रस्ताव बासनात पडला आहे. तीन दशकांत लोकसंख्या कित्येकपटीने वाढली. मात्र तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामांचा बोजा वाढल्याने तलाठी सज्जांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त सदस्य असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेला अहवाल वर्षभऱ्यापूर्वी सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली व अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे याविषयी आग्रही होते. मात्र त्यांच्यानंतर हा विषय तूर्तास बासनात गुंडाळला गेला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांत ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. जिल्ह्यात ४०० तलाठी साझे आहेत व वाढत्या शेतकरी खातेदारांच्या १० प्रकरणांत म्हणजेच जिल्ह्यात नव्याने ४० तलाठी साझे वाढणार आहे. यामुळे तलाठ्यांवर ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी शासनस्तर पाठपुरावा होणे महत्त्वाचे आहे. १९८३ मध्ये झाली होती तलाठी सज्जांची निर्मिती राज्यातील तलाठी सज्ज निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी १९७४ मध्ये कपूर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार १९८३ मध्ये तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. सद्यस्थितीत राज्यात १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. मात्र वाढता कामाचा बोजा असल्यामुळे सज्जांची वाढ करण्याची मागणी तलाठी संघटनेद्वारा होत असल्याने सज्जांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय सरकारने २०१४ मध्ये घेतला. (प्रतिनिधी)