उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव
By Admin | Updated: May 2, 2017 00:45 IST2017-05-02T00:45:31+5:302017-05-02T00:45:31+5:30
शहर पोलीस दलात उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह प्राप्त झाले.

उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव
अमरावती : शहर पोलीस दलात उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह प्राप्त झाले. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यामध्ये कोतवालीच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे, फे्रजरपुऱ्याचे एपीआय सतीश इंगळे, पोलीस शिपाई रमेश, रोशन, नरसिंग, महल्ले, संजय मारुती किन्नाके, गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते, अयुब शेख, फे्रजरपुऱ्यातील एएआय दिलीप वाघमारे, एएसआय केशव टेकाडे, महिला सेलचे एएसआय रमेश वानखडे, वाचक शाखेचे एएआय अशोक मांगलेकर, पोलीस नाईक सुरेंद्र राऊत, फे्रजरपुऱ्याचे पोलीस नाईक विनय गुप्ता, शहर वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार प्रफुल्ल धमाले, अनिल देवरणकर, राजापेठचे दिनेश भीसे, महिला पोलीस स्वाती कळसकर, परवाना शाखेतील प्रज्ञा अघम, सायबर सेलचे संग्राम, मनीष, फे्रजरपुऱ्यातील शिपाई गौतम, इशा, हर्षल, कोतवालीचे एएसआय संजय व पोलीस शिपाई सतीष यांना सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील पोलिसांचा सन्मान
उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ग्रामीण भागातील पोलिसांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळू मोहाडे, पीएसआय राजेंद्र होटे, एएसआय विनोद डहाके, अनिल राऊत, मुलचंद भांबुरकर, चालक अनिल वऱ्हाडे, रामराव नागे, पोलीस हवालदार गणेश खटाळे, संजय सुरोशे, सलीमोद्दन शफीयोद्दीन शेख नरेंद्र वानखडे, पोलीस नाईक किरण साधनकर, मदन डोळस व किशोर बाजड यांना गौरविण्यात आले आहे.