शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदांमध्ये शासनामार्फत ‘जीआयएस’ प्रणाली

By admin | Updated: August 7, 2015 00:31 IST

जिल्ह्यासह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्तांचे सर्वेक्षण भौगोलिक माहिती प्रणाली ....

नवे धोरण : हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण होणारअमरावती : जिल्ह्यासह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्तांचे सर्वेक्षण भौगोलिक माहिती प्रणाली (जिआॅग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम जीआयएस) मार्फत केले जाणार आहे. नगरपरिषद, नगरपंचायत व ‘ड’ वर्ग महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी लागणारा खर्च नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कोट्यवधी रूपये वाचणार आहेत. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या योजनांतर्गत प्रकल्पांना मान्यता देताना केंद्र शासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना जीआयएस पद्धतीचा अवलंब करणे व मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण ८५ टक्के करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि बहुतांश नागरी संस्थांकडून या सुधारणांची पूर्तता होत नसल्याने त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित निधी मिळत नाही. या पार्श्वभूमिवर या संस्थांचे उत्पन्न वाढण्यासाठी करविषयक प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करून डाटा संगणकीकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक आणि नगरविकास विभाग २ चे सचिव या तिघांची समिती एजन्सीची निवड करणार आहे. नगरविकासचे सचिव हे समितीचे निमंत्रक असतील. (प्रतिनिधी)